45 दिवसांनी लेकरं भेटली आईला, सुप्रिया सुळेंची अशीही मदत

45 दिवसांनी लेकरं भेटली आईला, सुप्रिया सुळेंची अशीही मदत

अवघ्या सहा वर्षांचा कियान आणि नऊ वर्षांची किमया ही मुले आज-उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती.

  • Share this:

बारामती, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन लागू झाल्यामुळे अनेक ठिकाणी लोकं अडकली  आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आजीकडे गेलेल्या दोन मुलांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे आई-वडिलांशी भेट झाली. तब्बल 45 दिवस आईच्या आठवणींनी मुले आणि मुलांच्या आठवणींनी आई व्याकुळ झालेल्या या कुटुंबात आनंद संचारला असून सर्वांनी सुळे यांचे भरभरून आभार मानले.

पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या सुरेखा आणि श्रीकांत तेली या दाम्पत्याची कियान आणि किमया अशी ही दोन मुले आहेत. हे दोघे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर या गावी आपल्या आजीकडे गेली होती.

हेही वाचा -राज्यातील फुकट रेशन वाटपाबाबत भाजप आमदाराने केला धक्कादायक खुलासा

दोन्ही मुले तिकडे गेल्यानंतर कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू झाला. अवघ्या सहा वर्षांचा कियान आणि नऊ वर्षांची किमया ही मुले आज-उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती. मात्र, दिवसामागून दिवस सुरू लागले तरी वाहतूक सुरू होईना. आधी 21 दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई-वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. इकडे आईचा जीवसुद्धा कासावीस झाला. मोबाईल वरून एकमेकांशी संपर्क होत असला तरी प्रत्यक्ष भेट घेऊन आईच्या कुशीत झेपावण्यासाठी मुलं अक्षरशः व्याकुळ झाली होती.

काही मार्गच दिसत नव्हता. त्यामुळे अखेर सुरेखा तेली यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले 45 दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही मुलांना पुण्यात आणण्याची परवानगी मिळाली.

हेही वाचा - किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर

आवश्यक परवानग्या घेऊन कन्नड तालुक्यातून रवाना झालेली गाडी कालच दोन्ही मुले घेऊन  खराडी येथील तेली यांच्या घरी पोहोचली. दारात गाडी पोहोचताच मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यात अश्रू आणून सुरेखा तेली यांनी मुलांना कवटाळले. तेली कुटुंबीयांनी खासदार सुळे यांचे भरभरून आभार मानले.

संपादन - सचिन साळवे

First published: April 26, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading