ज्योती मौर्याने घेतला मोठा निर्णय
प्रयागराज, 18 जुलै : उत्तर प्रदेशातील एसडीएम ज्योती मौर्य यांचे प्रकरण खूप चर्चेत आहे. प्रत्येकजण याबद्दल चर्चा करत आहेत, काही लोक ज्योती मौर्याबद्दल गाणी बनवत आहेत, कोणी विनोद बनवत आहेत तर कोणी मीम्स बनवत आहेत. मात्र, तुम्हीही असे काही केले असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही म्हणाल हे कसे होऊ शकते. स्वत: एसडीएम ज्योती मौर्य यासाठी तयारी करत आहेत. एका टीव्ही चॅनलशी संवाद साधताना ज्योती मौर्या यांनी सांगितले की, ज्यांनी तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याविरुद्ध ती कायदेशीर कारवाई करणार आहे. यावेळी बोलताना पती आलोकबद्दल म्हटले आहे की, घरातील सदस्यांनी जेव्हा घरची गोष्ट जगासमोर आणली तेव्हा बाहेरच्या लोकांबद्दल काय बोलावे. ज्या कुटुंबीयांनी मर्यादा पाळायला हवी होती, त्यांनी तमाशा केला आहे. पतीच्या तडजोडीच्या वक्तव्यावर ज्योती मौर्या म्हणाल्या की, माझ्या पतीला हे हवे आहे, पण माझ्यासोबत काय झाले हे बाहेरच्या कुणालाही माहिती नाही. महिला नोकरी करत असेल किंवा करत नसेल पण तिला स्वतःचा मान असतो आणि तो तिला प्रिय असतो. आलोकपासून वेगळे होण्याचा मी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. वाचा - पुन्हा ज्योती मौर्य! नवऱ्याने जमीन विकून शिकवलं; बायकोने नोकरी मिळताच… ज्योती पुढे म्हणाली की, केवळ मीच नाही तर माझी वहिनीही आलोकच्या कुटुंबीयांच्या छळाची शिकार झाली आहे. त्यांनी सांगितले की, आलोकच्या कुटुंबीयांनी त्यांचा मोठा मुलगा विनोद मौर्य (ज्योतीचा दीर) याचे लग्न खोटे बोलून लावले होते. तिने सांगितले की, तिचा दीर पोलीस इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी असल्याचे भासवून लग्न केले होते, पण लग्नानंतर माझ्या जावेला कळले की तो कारकून आहे. तिने सांगितले की, माझ्याशीही खोटे बोलून लग्न केले होते आणि मला सांगण्यात आले की आलोक हा ग्रामपंचायत अधिकारी आहे पण तो चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे.
त्याचवेळी, आलोक मौर्य यांनी आपल्या अधिकारी पत्नीविरोधात जोरदार पुरावे गोळा करण्यासाठी एका आठवड्याची रजा घेतली आहे. सफाई कर्मचारी आलोक मौर्य यांनी रजेचे पत्र एडीओ पंचायतीला गावप्रमुखाकडून पाठवून दिले आहे, त्यानंतर त्यांना ब्लॉकमधून सुट्टी मिळाली आहे.