ATM मधून अचानक निघाल्या 100 ऐवजी 500 च्या नोटा, पैसे काढणाऱ्यांच्या लागल्या रांगा
आग्रा, 24 जून : आग्रा येथील शास्त्रीपुरम प्राक्षी एन्क्लेव्ह शाखेत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडू लागल्या. एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनी पैसे काढल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. एटीएममध्ये झालेल्या बिघाडाचा फायदा लोकांनी उचलला. ही बाबा समजताच बँकेच्या लोकांनी तेथे धाव घेतली परंतु त्यांची टीम घटनास्थळी पोहोचे पर्यंत एटीएममधून सुमारे 1,72,000 रुपये काढण्यात आले होते. सीएमएस कंपनीचे शाखा व्यवस्थापक अंशुल मलिक म्हणाले की, एटीएममध्ये 1,72,000 रुपये होते, त्यांना एमएसपीकडून माहिती मिळाली होती की एटीएम 100 रुपयांऐवजी 500 रुपयांच्या नोटा देत आहे. टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा लोकांनी आधीच पैसे काढून घेतले होते आणि एटीएम उघडे होते. आतापर्यंत एकूण किती रक्कम काढण्यात आली याची माहिती काढली जात आहे. यात एटीएममधून कोणी किती पैसे काढले, कोणी सर्वाधिक पैसे काढले याचा छडा लावला जाणार आहे. एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड झालेल्या अडल्ट व्हिडीओने उडाली खळबळ एटीएम मशीन सोबत छेडछाड झाल्याचा अंदाज बँक कर्मचाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. मात्र प्रथमदर्शनी हा तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे. सीएमएसचे शाखा व्यवस्थापक अंशुल मलिक यांनीही प्रक्षी टॉवर शास्त्रीपुरम येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.