वाराणसी, 24 जून : यूपीच्या वाराणसी महानगरपालिकेची वेबसाइट शनिवारी हॅकर्सनी हॅक केली. अधिकृत वेबसाइट हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी त्यावर एकामागून एक अनेक अडल्ट व्हिडिओ अपलोड केले. याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजताच विभागात खळबळ उडाली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वाराणसी सायबर सेलकडे तक्रार केली. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत पोलिस आणि सायबर तज्ज्ञांच्या पथकाला हॅकझालेली वेबसाईट पूर्वपदावर आणता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजताच हॅकर्सनी वाराणसी महापालिकेची वेबसाईट हॅक केली होती. त्यानंतर त्यावर एक एक करून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड होऊ लागले. सुरुवातीला पेजच्या ऑपरेटरनेही ते हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हिडिओ हटवले जात नसल्याने अधिकारी लगेच सक्रिय झाले. 15 वर्षांच्या मुलांची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधून करतो अभ्यास; सगळेच झाले हैराण वाराणसीचे महापालिका आयुक्त सिपू गिरी यांनी सांगितले की, वाराणसी पोलिसांना यापूर्वीच तक्रार देण्यात आली आहे. याशिवाय टेक्निकल टीम ते दुरुस्त करण्यासाठी सतत काम करत आहे. संकेतस्थळ निश्चित झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात येणार असून याद्वारे नागरिकांना त्यांच्या तक्रारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर असे अडल्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक त्याची खिल्ली उडवत आहेत. त्याबाबत वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.