महाराष्ट्रासाठी अमित शहांचा 'अॅक्शन प्लान', या आहेत 16 महत्वाच्या गोष्टी

News18 Lokmat
मुंबई,ता.22 जुलै: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईत पक्षाच्या विस्तारकांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं सांगत कार्यकत्यांना या 16 महत्वाच्या गोष्टी करण्याचे आदेश दिलेत.हा आहे 'अॅक्शन प्लान'1) सोशल मीडियावर असलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करा.

2) एक बुथ 25 कार्यकर्ते अशी योजना तयार करा.3) प्रत्येक बुथवर 5 कार्यकर्त्यांकडे मोटरसायकल असेल याची काळजी घ्या.4) प्रत्येक बुथ मधल्या मंदिराची माहिती, त्यांचे ट्रस्टी आणि पुजाऱ्याचा नंबर याची यादी तयार करा.5) प्रत्येक बुथ मधल्या मशिदीची यादी तयार करणे6) सरकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करा.7) तीनही पक्ष एकत्र आले तरी भाजपला 51 टक्के मतदान होईल याची काळजी घ्या.8) आपल्या विभागातल्या जनतेशी सातत्याने संपर्कात राहा.9) मुद्रा बँकेतून जास्तित जास्त जणांना लोन देण्याचा प्रयत्न करा.10) प्रत्येक बुथ मध्ये 10 एससी, 10 एसटी, 10 ओबीसी कार्यकर्त्यांची फळी तयार करा.11) पाच घरांसाठी एक भाजप कार्यकर्ता राहिल याची काळजी घ्या.12) अन्य पक्षात काय चाललं याची माहिती ठेवा.13) अन्य पक्षातल्या नाराज कार्यकर्त्यांची यादी तयार करा आणि त्यांच्या संपर्कात राहा.14) एकदा जिंकलं म्हणजे दुसऱ्यांदा जिंकेल याची खात्री नाही हे लक्षात घेऊन काम करा.15) विस्तारकांना ऑनलाईन रिपोर्टींग करावं लागेल. त्यांच्यासाठी वेगळं मोबाईल अॅप तयार करणार.16) सरकारकडून काम करून दिलं जाईल असं आश्वासन विस्तारकांनी देवू नये.हेही वाचा...

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश

मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

उद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र

Trending Now