S M L

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Updated On: Jul 22, 2018 02:01 PM IST

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

पंढरपूर, 22 जुलै : आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला खूप मोठी सुरक्षा आहे. मला कोणी हात नाही लावू शकत पण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही.

माझ्या विठ्ठलाला मी घरात पुजेन पण माझ्यामुळे देशभरातल्या वारकऱ्यांना वेठीस घेतलेलं चालणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. मला कशाचीही भिती नाही पण वारकऱ्यांना याचा काही त्रास होऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मराठा मोर्चाला आरक्षण देणं हे सरकारच्या नाही तर आता न्यायालयाच्या हाती आहे. त्यामुळे ज्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही ते फक्त राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

या सगळ्यामुळे आजपर्यंत चालत आलेली शासकीय पुजेची प्रथा मोडली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होणार पंढरपूरात होणार नाही. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या उद्याच्या पंढरपूर आंदोलन स्थगित वारकऱ्यांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित केलं आहे. पण संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय पूजेपासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मराठा क्रांती मोर्चाचे पंढरपुरात आंदोलन होणार नाही. मात्र इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा औरंगाबाद संयोजक समितीनं दिला आहे.

हेही वाचा...

Loading...
Loading...

उद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र

नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2018 01:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close