S M L

मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

सहकारमंत्र्यांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आंदोलक मात्र आक्रमक होते.

Updated On: Jul 22, 2018 12:52 PM IST

मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

22 जुलै : आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आता पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. ठिकठिकाणी मोर्चाला हिसंक वळण लागताना दिसलं. मंगळवेढयातून येत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजी केली. सहकारमंत्र्यांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आंदोलक मात्र आक्रमक होते. त्यांनी बराच वेळ सुभाष देशमुख यांचा ताफा अडवून धरला होता.

एकीकडे आक्रमक झालेल्या मराठा मोर्चाने पंढरपूरमध्ये एसटी बस फोडली आहे. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर ही बसची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे परळीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अजूनही सुरूच असून काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून लेखी आश्वासन येऊन सुध्दा हे आंदोलन सुरूच आहे.

उद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र

आंदोलकांच्या मागणीवरून काल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मराठा आरक्षणाबाबत लेखी खुलासा करण्यात आला असून 72 हजार नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात सांगितले तेच या आंदोलकांना लेखी कळविले आहे. परंतु या आंदोलकांनी मात्र आरक्षणाचा विषय जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत कुठलीच भरती करायची नाही अशी ठोस भुमिका घेतलीय.

दरम्यान काल रात्री शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या आंदोलकांना भेट दिली. या वेळी आंदोलकांशी संवाद साधताना शासनाची भूमिका मांडली परंतु ते आंदोलकांना न पटल्याने त्यांनी मेटेंना बोलू दिले नाही.

Loading...
Loading...

हेही वाचा...

नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

भाजपचा नराधम नगरसेवक,लग्नासाठी तरुणीवर 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2018 12:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close