नवी दिल्ली, 19 मे : कोरोना लॉकडाऊनमध्ये (lockdown) अनेक जण समस्यांचा सामना करत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र लॉकडाऊननंतर सर्वात भयानक अवस्था असेल ती लहान मुलांची. लहान मुलांबाबत नोबेल विजेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 20 देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स यांच्या जी-20 समूहाकडे मुलांसाठी एक ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. जगभरातील 85 नोबेल विजेते, माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे दोन माजी अध्यक्ष यांनी ही मागणी केली आहे. यामध्ये भारतातर्फे कैलाश सत्यार्थी आणि दलाई लामा यांचा समावेश आहे. हे वाचा - ‘30 दिवसात सुधारा नाहीतर…’, डोनाल्ट ट्रम्प यांनी WHOला पत्राद्वारे दिली धमकी लॉरिएट्स अँड लीडर्स फॉर चिल्ड्रन्स संस्थेच्या अंतर्गत हे आवाहन करण्यात आलं आहे. त्यांच्या मते, लॉकडाऊननंतर विशेषत: लहान मुलांची अवस्था जास्त खराब होईल. चाइल्ड ट्रॅफिकिंग (child trafficking) आणि लहान मुलांसंबंधी गुन्हे वाढू शकतात. घरात काम करणाऱ्या मुलांवर होणारे लैंगिक अत्याचारही वाढू शकतो. न्यूज 18 शी बोलताना नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी सांगितलं की, हे बजेट जगातील त्या वंचित वर्गाच्या 20 टक्के मुलांवर खर्च होईल. यामार्फत शिक्षण, पाणी, सॅनिटेशन आणि आरोग्यासारख्या सुविधा पुरवल्या जातील. याशिवाय लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वात मोठी समस्या येईल त्यात महत्त्वाची आहे ती चाइल्ड ट्रॅफिकिंग. घर, हॉटेल आणि ढाब्यांवर पुन्हा लहान मुलांची संख्या वाढू शकते. हे वाचा - पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, लॉकडाउन 4 सुरू झाल्यानंतर ‘हे’ झाले बदल घरात अडकलेल्या मुलांना लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो. मुलांना आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागू शकतं. परिस्थितीचा फायदा घेऊन छोट्या कारखान्यात बालकामगार वाढवले जातील. रेड लाइट एरियातही मुलांना भीक मागायला लावली जाऊ शकते. मुलांना वापर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधील मोबाइल, लॅपटॉप आणि पर्स चोरण्यासाठी होऊ शकतो. सध्या यांचं प्रमाण कमी आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान हे वाढू शकतं. संकलन, संपादन - प्रिया लाड