वॉशिंग्टन, 19 मे : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अॅडॅनॉम यांना चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी टेड्रोस यांना येत्या 30 दिवसात मोठे बदल करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की एकतर WHOला आपली धोरणं सुधारावी लागतील अन्यथा त्यांना देण्यात आलेला निधी कायमचा बंद होईल. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये टेड्रोसयांना पाठविलेले संपूर्ण पत्र शेअर केले असून यासह अमेरिकेने WHOचे सदस्यत्व सोडण्याबाबत विचार करत असल्याचेही यावेळी स्पष्ट केलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी WHOच्या महासंचालकांना 4 पानांचे पत्र लिहिले आहे, त्या पत्रात WHOचे अपयश दाखवण्यात आले आहे. तसेच, चीनच्या दबावाखाली आणि प्रभावाखाली काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी WHOचे कामकाज सुधारले नाही तर हा फंडा कायमचा बंद केला जाईल असा इशारा अध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे. पत्रात ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यक ती पावले न उचलल्याबद्दल टीका केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की WHOने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमध्ये पसरलेल्या विषाणूशी संबंधित विश्वसनीय रिपोर्टकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. चीनचे सातत्याने कौतुक केल्याबद्दल त्यांनी WHO निंदा केली. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की WHOला पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘चीनपासून स्वतंत्र असल्याचे दर्शविणे’. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी WHOचे सदस्यत्व सोडण्याचेही बोलून दाखवले. वाचा- अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्येच तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा आरोप
This is the letter sent to Dr. Tedros of the World Health Organization. It is self-explanatory! pic.twitter.com/pF2kzPUpDv
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 19, 2020
वाचा- अमेरिकेच्या नाकावर टिच्चून चीनची WHO मोठी मदत, व्हायरसच्या चौकशीची मागणी फेटाळली ट्रम्प यांची WHOवर टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर WHOही चीनच्या तालावर नाचत असल्याची टीका सातत्याने केली होती. त्याच्याच पुढचं पाऊल टाकत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOची सर्व मदतही बंद केली होती. ही संघटना अमेरिकेकडून मदत घेते आणि चीनला मदत करते असे आरोप त्यांनी केले होते. चीनची WHOला मदत WHOच्या वल्ड हेल्थ समिटमध्ये बोलताना त्यांनी अमेरिकेचं नाव न घेता सर्व आरोप फेटाळून लावले आणि WHOला पुढच्या दोन वर्षांसाठी 2 बिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. चीनने सर्व जगाला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाहिजे ती सर्व माहिती दिली आणि पारदर्शकपणे परिस्थिती हाताळली असं जिनपिंग यांनी सांगितलं. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेने केलेली चौकशीची मागणी चीनने फेटाळल्याचं बोललं जात आहे. वाचा- वुहानमधली ‘ती’ स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा