पुणे, 19 मे : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन करण्यात आलं आहे. परंतु, चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहे. मुंबईपाठोपाठ सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळून आले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन 4 मध्ये थोडे बदल करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून लॉकडाउन 4 संबंधीची नियमावली मिळाल्यानंतर नवे आदेश जारी करण्यात येणार आहे. तर पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुणे मार्केट यार्ड पूर्णत: बंद राहणार आहे. तसंच भुसार मार्केटही आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्याने भुसार व्यापारी धास्तावले आहे. त्यामुळे भुसारा व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मार्केट समिती प्रशासनांची आज व्यापाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे.
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 4177 वर
दरम्यान, पुणे जिल्ह्यात 18 मेपर्यंत 159 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 4177 वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 211 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
गावागावात पुढाऱ्यांच्या 'जनता कर्फ्यू'ला चाप
दरम्यान, पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे गावकरी प्रचंड धास्तावले आहे. कोरोनाचे रुग्ण आपल्या हद्दीत येऊ नये म्हणून अनेक गावांनी आपल्या सीमा बंद केल्या आहे. परंतु, काही ठिकाणी गावातील पुढाऱ्यांकडून बाहेरून येणाऱ्या आणि गावातील लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचं समोर आलं आहे. गावातील काही पुढारी हे परस्पर 3 ते 4 दिवसांचे जनता कर्फ्यू जाहीर करत होते. त्यामुळे गावात सर्वच दुकानं बंद पाडण्याचे काम सुरू होते. पुढाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता.
हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवा शोध, रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी
अखेर पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी गावपातळीवरील स्वयंघोषित 'जनता कर्फ्यू'ला चाप लावला आहे. 'शासनाच्या नियमानुसार, दुकानं सुरू राहितील, कोणताही शासनाच्या आदेशाशिवाय लागू होणार नाही', असं जिल्ह्याधिकाऱ्यांनी बजावलं आहे. तसंच गावातील क्वारंटाइन सेंटर्समधून सुविधा द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.