JOIN US
मराठी बातम्या / देश / बदला अभी बाकी! पुलवामा हल्ल्यातील 19 गुन्हेगार, 8 ठार, 7 तुरुंगात, उर्वरित कुठे आहेत फरार?

बदला अभी बाकी! पुलवामा हल्ल्यातील 19 गुन्हेगार, 8 ठार, 7 तुरुंगात, उर्वरित कुठे आहेत फरार?

Pulwama Attack anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या 19 दहशतवाद्यांपैकी 8 ठार झाले आहेत, 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 4 अजूनही फरार आहेत.

जाहिरात

बदला अभी बाकी!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 14 फेब्रुवारी : आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी देशभरात व्हॅलेंटाईनची तयारी सुरू असतानाच पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भळभळत्या जखमेची आठवण सांगताना, काश्मीर झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या 19 दहशतवाद्यांपैकी 8 ठार झाले आहेत, 7 पकडले गेले आहेत आणि इतर चार अजूनही फरार आहेत. त्यात 3 पाकिस्तानींचाही समावेश आहे. ADGP काश्मीर झोन विजय कुमार म्हणाले की, जैश-ए-मोहम्मदचे 7-8 स्थानिक दहशतवादी अजूनही शिल्लक आहेत. पुलवामामध्ये सक्रिय असलेल्या मुसा सुलेमानीसह 5-6 पाकिस्तानी दहशतवादी लवकरच मारले जातील. ते म्हणाले की, जैश-ए-मोहम्मदने गेल्या 6 महिन्यांपासून आपली भरती वाढवली आहे. मात्र, आता त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये वाढू दिले जाणार नाही. काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, सध्या काश्मीरमध्ये 37 दहशतवादी सक्रिय आहेत. श्रीनगरमध्ये एकही नवीन दहशतवादी भरती झालेला नाही. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रद्धांजली वाहल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एडीजीपी विजय कुमार म्हणाले की सुरक्षा दल जैश-ए-मुहम्मदच्या मागे लागले आहेत. त्याचे जवळपास सर्व प्रमुख कमांडर संपवले गेले आहेत. वाचा - श्रद्धा वालकर खूनातील आरोपी आफताफला घ्यायचंय उच्च शिक्षण; कोर्टाकडे केली मोठी… काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, सुरक्षा एजन्सी वेगाने दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत आहेत. नार्को-दहशतवाद आणि दहशतवादी फंडिंग यांना विशेष लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही 41 लाख रुपये जप्त करण्यात यशस्वी झालो आहोत आणि नुकतेच बारामुल्लामध्ये 26 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.’ एडीजीपी विजय कुमार यांनी असेही सांगितले की, अशा कारवायांमध्ये गुंतलेल्यांविरुद्ध नोंदवलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशा प्रकरणांची संख्या 1600 वरून आता 950 वर आली असून आतापर्यंत 13 दोषींना शिक्षा झाली आहे. ते म्हणाले की, सध्या एकूण 37 स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी फक्त फारुख नल्ली आणि रियाझ छत्री हे जुने आहेत, तर बाकीचे नुकतेच रुजू झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या