जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर खूनातील आरोपी आफताफला घ्यायचंय उच्च शिक्षण; कोर्टाकडे केली मोठी मागणी

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर खूनातील आरोपी आफताफला घ्यायचंय उच्च शिक्षण; कोर्टाकडे केली मोठी मागणी

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अपडेट

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अपडेट

श्रद्धा वालकर प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेला श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला या प्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलीस करत आहेत. या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं होतं. अंगावर शहारा आणणारं हे प्रकरण अजून ताजचं आहे. यात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने उच्च शिक्षण घेण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे पोलिसांकडून परत मिळावीत, अशी मागणी आता न्यायालयाकडे केली आहे. आफताब पूनावाला यांनी साकेत न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये आफताब पूनावालाने पुढील शिक्षणासाठी (उच्च शिक्षण) त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र जारी करण्याची मागणी केली आहे. सध्या आफताब पूनावाला याची सर्व कागदपत्रे दिल्ली पोलिसांकडे आहेत. यासोबतच आफताबने तिहार तुरुंगात अभ्यासासाठी स्टेशनरी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केला आहे. आपल्या दुसऱ्या अर्जात आफताब पूनावालाने आपल्या वकिलामार्फत आरोपपत्राची प्रत आणि व्हिडिओ पुरावे संघटित पद्धतीने (वेगळे फोल्डर बनवून) उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आफताब पूनावालाच्या वकिलाने म्हटले आहे की, चार्जशीट आणि इतर व्हिडिओ फॉरमॅट्स अत्याधुनिक संगणकांमध्ये सपोर्ट करत नाहीएत. दिल्ली पोलिसांनी मुद्दाम चार्जशीटमध्ये असा फॉरमॅट दिला आहे, जो वाचता येत नाही, असा आरोपही त्यांनी अर्जात केला आहे. हेही वाचा -  समलैंगिक ॲपवरून ओळख, IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार, तंत्रविद्येचाही वापर, मुंबईतील हादरवणारी घटना विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर खून प्रकरणात 3 हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांनी 100 साक्षीदारांची यादीही तयार केली आहे. श्रद्धा हत्याकांडाचे आरोपपत्र कायदेशीर मतासाठी पाठवण्यात आले आहे. आपल्या चार्जशीटमध्ये, दिल्ली पोलिसांनी डीएनए जुळण्याव्यतिरिक्त श्रद्धाची ओळख स्थापित करण्यासाठी फॉरेन्सिक पुराव्याची यादी समाविष्ट केली आहे. श्रद्धा वालकर (२७) हिची हत्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आफताब पूनावाला याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले होते. या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात