JOIN US
मराठी बातम्या / देश / Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; 9 जणांचा मृत्यू, 10 जखमी

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; 9 जणांचा मृत्यू, 10 जखमी

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंफाळ, 14 जून : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मणिपूरच्या खमेनलोक परिसरात मंगळवारी रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इंफाळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यता आलं आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिक्षक शिवकांत सिंह यांनी सांगितलं की,  या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती समोर येईल. आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू  मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चाळीस हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापीत झाले आहेत. मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायामध्ये गेल्या मे महिन्यात वाद झाला होता, तेव्हापासून या हिसांचाराला सुरुवात झाली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 115 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या