आईच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ 22 जून : आई आणि मुलाचं नातं हे अगदी खास असतं. एकमेकांना त्रासत पाहाणं त्यांना अजिताबही जमत नाही, असं म्हणतात. आता याचाच प्रत्यय देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ओब्रा पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर राहणारे हनुमान प्रसाद गुप्ता यांचा अवघ्या वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी हिरामणी (वय 81 वर्षे) यांचे बुधवारी दुपारी अचानक निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबातील मोठा मुलगा राजेश गुप्ता (वय 55 वर्षे) आणि लहान मुलगा सुरेश गुप्ता वय 45 वर्षे घरी पोहोचले होते. मोठा मुलगा राजेश गुप्ता मुंबईत कामाला होता आणि आईच्या निधनाची बातमी समजताच तो ओब्रा येथे आला. आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांनी चोपण येथील सोन नदीच्या काठावर नेलं, तिथे मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही धक्क्याने मृत्यू झाला. घाईगडबडीत घाटावर उपस्थित लोकांनी राजेशला स्थानिक चोपण रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या कारणामुळे स्वतःच्या चितेची तयारी करत वृद्ध दाम्प्त्याची आत्महत्या, कोल्हापूरात खळबळ या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा रंगत आहेत, तर कुटुंबाची दुरवस्था झाली आहे. आईच्या जळत्या चितेसमोर कुटुंबातील मोठ्या मुलाचा श्वास अचानक थांबला, त्यामुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. लहान भाऊ सुरेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं, की आई हिरामणी यांचे निधन झाले . त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी चोपण स्मशानभूमीत आणण्यात आले आणि मोठा भाऊ राजेश गुप्ताही अंत्यसंस्कार करण्यासाठी आला. आईची जळणारी चिता पाहून मोठा भाऊ राजेश गुप्ता याचा मृत्यू झाला. तेथे बसलेल्या लोकांनी त्याला पाहताच तात्काळ चोपण सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. राजेश गुप्ता हे मुंबईत राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.