JOIN US
मराठी बातम्या / देश / रेल्वेकडून सगळ्यात मोठी चूक, स्पेशन ट्रेनमधून 5 लोकांनी विनातिकीट केला प्रवास

रेल्वेकडून सगळ्यात मोठी चूक, स्पेशन ट्रेनमधून 5 लोकांनी विनातिकीट केला प्रवास

एकीकडे रेल्वेने दावा केला आहे की प्रत्येक प्रवाशाचे स्क्रिनिंग व तिकिट तपासणीनंतरच लोक स्टेशनमध्ये प्रवेश करतात, या प्रकरणामुळे रेल्वेची चूक उघडकीस आली आहे.

जाहिरात

रेल्वेने बंगळुरू, चंदीगड, हावडा, जयपूर, पाटना, प्रयागराज, सिकंदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांचे दोन क्लस्टरमध्ये विभाजन केले आहे. भारतीय रेल्वेच्या अंदाजानुसार खासगी कंपन्यांमुळे रेल्वेत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मे : लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली ते बेंगळुरू दरम्यान चालवल्या जाणाऱ्या श्रमिक स्पेशन ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. या ट्रेनमधून चार वयस्कर आणि एका लहान मुलानंविनातिकीट प्रवास केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे रेल्वेने दावा केला आहे की प्रत्येक प्रवाशाचे स्क्रिनिंग व तिकिट तपासणीनंतरच लोक स्टेशनमध्ये प्रवेश करतात, या प्रकरणामुळे रेल्वेची चूक उघडकीस आली आहे. पकडलेल्यांना उत्तर प्रदेशातील झाशी स्टेशनवर उतरवण्यात आले आहे, तर या प्रकरणात रेल्वेने 32 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 30 जूनपर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचं तिकीट रद्द कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी देशात 30 जूनपर्यंत प्रवाशांसाठी ट्रेन बंद ठेवण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी तिकीट बुकिंग केलं आहे त्या सर्वांना ते लवकरच वर्किंग डेमध्ये रिफंड करण्याची सुविधा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत केवळ श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती आता मिळाली आहे. भारतीय रेल्वेनं 12 मेपासून स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत. डिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू या ठिकाणी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तिकीट बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना पैसे रिफंड मिळणार देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकऊनमुळे गेल्या 50 दिवसांपासून रेल्वेसेवा बंद होती. यामुळे हजारो प्रवासी अडकले होते. रेल्वेकडून 10 मे ला स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता 30 जूनपर्यंत केवळ श्रमिकांसाठी ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वेकडून 30 जूनपर्यंत तिकीट बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना पैसे रिफंड मिळणार आहेत. असंही सांगण्यात आलं आहे. संबंधित- लॉकडाऊमध्ये अडकलेल्यांसाठी मोठी बातमी, 30 जूनपर्यंत मेल एक्स्प्रेसचं तिकीट रद्द मुंबईच्या या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, BMC ने घेतला निर्णय येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, ‘हा’ आजार ठरणार कारण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या