प्रतिकात्मक फोटो
विजवाडा 30 मार्च : विमानाने वेळेपेक्षा उशिरा उड्डाण केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र आंध्र प्रदेशमधून एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे, ज्यात विमानाने ‘निर्धारित वेळेच्या’ 12 तास आधीच विमानतळावरून उड्डाण केलं. या गोंधळामुळे 20 हून अधिक प्रवाशांची फ्लाईट चुकली. या घटनेनंतर विमानात चढू न शकलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील विजवाडा येथे घडली. एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान बुधवारी दुपारी 1.10 वाजता येथील गन्नावरम विमानतळावरून कुवेतसाठी रवाना होणार होतं. मात्र, हे विमान नियोजित वेळेच्या 12 तास आधी म्हणजे रात्री 1.10 वाजता निघालं आणि 20 हून अधिक प्रवाशांना हे समजलंच नाही, त्यामुळे त्यांची फ्लाईट मिस झाली. प्रवाशांचं म्हणणं आहे की, त्यांना दिलेल्या तिकिटात बुधवारी दुपारी 1:10 वाजता उड्डाणाची वेळ लिहिली होती. मात्र रात्री 1.10 वाजताच विमान रवाना झालं. वृत्तानुसार, एअर इंडियाच्या कर्मचार्यांनी दावा केला आहे की त्यांनी बुकिंग वेबसाइट आणि प्रवाशांना फ्लाइटच्या वेळेबद्दल माहिती दिली होती. मात्र, फ्लाईट मिस झालेल्या प्रवाशांनी असा आरोप केला आहे, त्यांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. इलेक्ट्रिक गाड्यांनंतर आता इलेक्ट्रिक हायवे; Rising India मध्ये नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन असाच एक प्रकार बंगळुरू विमानतळावर समोर आला. वृत्तानुसार, गो फर्स्ट या एअरलाइनच्या फ्लाइटने ५० हून अधिक प्रवाशांना सोडून येथून उड्डाण केले. विमानाने उड्डाण केले तेव्हा हे प्रवासी धावपट्टीवर बसमध्ये चढत होते. पण विमानाने त्यांना सोडून उड्डाण केले. हे प्रकरण बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या GoFirst फ्लाइट G8116 मधील आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने बेंगळुरू विमानतळाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे की, GoFirst फ्लाइट G8116 ने बेंगळुरूहून दिल्लीला 54 प्रवाशांना न घेता उड्डाण केले. या 54 प्रवाशांचे सामान फ्लाइटमध्ये होते. मात्र या प्रवाशांना न घेता विमानाने उड्डाण केले. युजरने लिहिलं की, विमानतळावर अनेक प्रवासी चिंतेत होते.