JOIN US
मराठी बातम्या / देश / गुगल मॅप्समुळे 10 वीचा विद्यार्थी पोहोचला चुकीच्या परीक्षा केंद्रावर; पुढे काय घडलं?

गुगल मॅप्समुळे 10 वीचा विद्यार्थी पोहोचला चुकीच्या परीक्षा केंद्रावर; पुढे काय घडलं?

एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 27 मार्च : शालेय जीवनात इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असतं. कारण या परीक्षेच्या मार्कांवर विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं. त्यामुळे या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळावं, या साठी विद्यार्थी आणि त्यांचे पालकदेखील विशेष कष्ट घेतात. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून प्रशासन आणि शिक्षण विभाग सर्व गोष्टींचे काटेकोर नियोजन करत असतो. या परीक्षांसाठी अनेक पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला दररोज परीक्षा केंद्रावर सोडायला आणि आणायलाही जातत. मात्र अलीकडच्या काळात, पेपर फुटणे, पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियात व्हायरल होणं, सामूहिक कॉपी यांसारखे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दरवर्षी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा चर्चेत येत आहेत. तेलंगणामध्ये मात्र जरा निराळीच घटना घडली आहे. गुगल मॅप्समुळे एक 10 वीचा विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचला. त्यामुळे त्याला परीक्षा देता आली नाही आणि त्याचं वर्षही वाया गेलं. `मँगो न्यूज डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. तेलंगणात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. तिथं माध्यमिक परीक्षेत एक विद्यार्थी नापास झाला. गुगल मॅप्समुळे या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेलं आहे. विनय असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. परीक्षा केंद्रावर जाताना पत्ता शोधण्यासाठी विनयने गुगल मॅप्स या इंटरनेटवरील सेवेचा वापर केला. गुगलने दाखवलेल्या पत्त्यावरील परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याला लक्षात आलं की आपला परीक्षा क्रमांक वेगळ्याच केंद्रावर आहे. त्यानंतर तो त्याला मिळालेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचला. तिथं पोहोचल्यावर तिथल्या परीक्षकांनी वेळेत परीक्षेला हजर न झाल्याबद्दल विनयला परीक्षेलाच बसू दिलं नाही. यामुळे विनयला त्या विषयाचा पेपरच लिहिता आलेला नाही. आता त्याचं वर्ष वाया गेल्याने त्याचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. दिव्यांग धीरजचा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त 13 दिवसांत श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल प्रवास, Video सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खम्माम मधील विनय नावाच्या विद्यार्थ्याला एका विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला. गुगल मॅप्समुळे तो चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचला. त्यामुळे त्याला माध्यमिक परीक्षेचा पेपर देता आला नाही. आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत हे लक्षात येताच विनय त्याला मिळालेल्या परीक्षा केंद्राकडे निघाला. गुगल मॅप्सने त्याला ज्या केंद्रावर पोहोचायचे होते त्यापेक्षा वेगळे लोकेशन दाखवले होते. त्यानंतर तो त्याच्या परीक्षा केंद्रावर पोहोचला पण तिथं पोहोचण्यासाठी विनयला बराच उशीर झाला. परिणामी अधिकाऱ्यांनी त्याला परीक्षा देण्यास परवानगी नाकारली. अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे विनय काहीच करू शकला नाही आणि तो निराश होऊन मागे फिरला. गुगल मॅप्समुळे विनय नापास झाला आणि शैक्षणिक वर्ष वाया गेलं. तंत्रज्ञानामुळे कितीही प्रगती झाली असली तरीही माणसाचा संबंध हा मौल्यवानच असतो. कदाचित विनयने एखाद्या व्यक्तीला विचारून परीक्षा केंद्र गाठलं असतं तर तो वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचू शकला असता. अर्थात आता त्याला या अनुभवानंतर एक धडा मिळाला असेल पण त्या पायी त्याला एक शैक्षणिक वर्ष गमवावं लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या