JOIN US
मराठी बातम्या / देश / उत्तराखंडमध्ये अजूनही 2000 लोक अडकलेले

उत्तराखंडमध्ये अजूनही 2000 लोक अडकलेले

29 जून : उत्तराखंडमधील बचावकार्य आता शेवटच्या टप्प्यात आलंय. अजूनही अडकलेल्या 2 हजार जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी हवामान स्वच्छ झाल्यानंतर हवाई बचावकार्य सुरू झालं. गोविंदघाटमध्ये नव्यानंच बांधण्यात आलेल्या फूट ब्रिजवरून बद्रीनाथमध्ये अडकलेल्या जवळपास 590 यात्रेकरूची सुटका करण्यात आली. जोशीमठ ते गोविंदघाटचा रस्ताही आता सुरू झालाय. काही गावांचा संपर्क अजूनही पूर्णपणे तुटलेला आहे. तिथं हेलिकॉप्टरमधून औषधं आणि अन्नाची पाकिटं पुरवली जात आहे. एकीकडे बचावकार्य संपत आलंय, तर दुसरीकडे भगिरथी नदीची पाणीपातळी वाढत असल्यानं चिंता निर्माण झालीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

India Floods 29 जून : उत्तराखंडमधील बचावकार्य आता शेवटच्या टप्प्यात आलंय. अजूनही अडकलेल्या 2 हजार जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी हवामान स्वच्छ झाल्यानंतर हवाई बचावकार्य सुरू झालं. गोविंदघाटमध्ये नव्यानंच बांधण्यात आलेल्या फूट ब्रिजवरून बद्रीनाथमध्ये अडकलेल्या जवळपास 590 यात्रेकरूची सुटका करण्यात आली.

जोशीमठ ते गोविंदघाटचा रस्ताही आता सुरू झालाय. काही गावांचा संपर्क अजूनही पूर्णपणे तुटलेला आहे. तिथं हेलिकॉप्टरमधून औषधं आणि अन्नाची पाकिटं पुरवली जात आहे. एकीकडे बचावकार्य संपत आलंय, तर दुसरीकडे भगिरथी नदीची पाणीपातळी वाढत असल्यानं चिंता निर्माण झालीय. त्यामुळे उत्तरकाशीतल्या लोकांना दुसरीकडे हलवण्यात येतंय. पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या