25 जानेवारी : 'बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया' हे गाणं लग्नसोहळ्यात नवं जोडप्यासाठी हमखास वाजवलं जातं. पंरतु, रुद्रप्रयागमधील त्रिजुगीनारायणमध्ये एका वधू आणि वरावर चक्क बर्फवृष्टी झाली. त्याचं झालं असं की, रुद्रप्रयागमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिव आणि पार्वती या जोडप्याचं लग्नाची तारीख ठरलेली होती. बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाल्यामुळे लग्न तर पुढे टाळता येणार नव्हते. मग काय शिव घरातून पायीच लग्नमंडपाकडे निघाला. वाटतेच वधू पार्वतीही शिवसोबत होती. शिव आणि पार्वतीने बर्फवृष्टीतच लग्नमंडप गाठले.