JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. अजित पवारांविरोधात मराठा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली बघा Exclusive व्हिडिओ.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 01 जुलै: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. राज्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत.

अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्येही वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली होती. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Contract health workers) केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमारही केला होता. आक्रमक कर्मचाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्या गाडी समोर उडी घेतली. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या