Home /News /nashik /

पार्किंगमध्ये होती e-Bike, मध्यरात्री अचानक स्फोट झाला; एका मागोमाग एक इतर दुचाकीही जळून खाक

पार्किंगमध्ये होती e-Bike, मध्यरात्री अचानक स्फोट झाला; एका मागोमाग एक इतर दुचाकीही जळून खाक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पार्किंगमध्ये ई बाईकचा स्फोट (E Bike Blast) घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गटना नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागातील अपार्टमेंटच्या वाहनतळात घडली.

  नाशिक, 18 मे : पार्किंगमध्ये ई बाईकचा स्फोट (E Bike Blast) घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गटना नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागातील अपार्टमेंटच्या वाहनतळात घडली. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट (Electric Bike Blast in Nashik) झाला. मध्यरात्रीची वेळ असल्याने येथील सर्व रहिवासी झोपेत होते. मात्र, ई बाईकचा स्फोट, त्याच्या आवाजाने येथील रहिवासी जागे झाले. कसा आला प्रकार समोर? ई बाईकच्या स्फोटाची ही घटना मंगळवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी सर्वच रहिवासी गाढ झोपेत होते. बाईकचा स्फोट झाला आणि एकामागोमाग एक आवाज झाले. यात सर्वच जण जागी झाले. यानंतर त्यांनी आपल्या खिडकी, बाल्कनीतून बाहेर येत पाहिले तर बाईकचा स्फोट झाल्याचे लक्षात आले. यावेळी वाहनळात एकच प्रकाश झाला होता. तसेच धुराचे लोट उठत असल्याचे येथील रहिवाशांना दिसले. वाल्मिक पाटील नावाच्या व्यक्तीची ही इलेक्ट्रिक दुचाकी होती. या दुचाकीच्या स्फोटामुळे अन्य पाच दुचाकींनाही आग लागली. त्यांचे आगीत मोठे नुकसान झाले. हेही वाचा - आर्थर रोड जेलमध्ये महिला कैदीसोबत भयंकर कृत्य, वाचून तुम्हच्याही अंगावर येतील शहारे
  आठ महिन्यांपूर्वी घेतली होती ई बाईक -
  वाल्मिक पाटील यांनी आठ महिन्यांपूर्वी या इलेक्ट्रिक बाईकची खरेदी केली होती. नेहमीनुसार त्यांनी आपली ही इलेक्ट्रीक बाईक वाहनतळात उभी केली होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास या इलेक्ट्रिक बाईकचा अचानक स्फोट झाला. या घटनेत इतर रहिवाशांच्या दुचाकीदेखील जळून राख झाल्या आहेत. साताऱ्यातही धावत्या ई बाईचा स्फोट - सातारा जिल्ह्यातही धावत्या इ-बाईकने पेट घेतल्याची घटना घडली. सातारा येथील आरळे येथे ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे या ई बाईकला आग लागली. यात ही बाईक पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. तुनवाल कंपनीची ही बाईक होती. जयवंत आनंदराव साबळे असे बाईकच्या मालकाचे नाव आहे. ही बाईक चार वर्षे जुनी आहे. जयवंत यांचा मुलगा ओम साबळे हा ही बाईक घेऊन साताऱ्याला जात असताना हा प्रकार घडला. पेट्रोल पंपाजवळ बाईकमधून अचानक धूर निघू लागला. हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर बाईकने पेट घेतला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Nashik, Shocking news

  पुढील बातम्या