मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik : शेतकरी हताश! सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ

Nashik : शेतकरी हताश! सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यातील सुस्मिता सोनवणे या टरबूज उत्पादक शेतकरी महिलेने (women farmer) आपला टरबूज (water melon) कवडीमोल भावात जात असल्याने काढलेला सगळा माल जनावरांना घातला

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यातील सुस्मिता सोनवणे या टरबूज उत्पादक शेतकरी महिलेने (women farmer) आपला टरबूज (water melon) कवडीमोल भावात जात असल्याने काढलेला सगळा माल जनावरांना घातला

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यातील सुस्मिता सोनवणे या टरबूज उत्पादक शेतकरी महिलेने (women farmer) आपला टरबूज (water melon) कवडीमोल भावात जात असल्याने काढलेला सगळा माल जनावरांना घातला

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 12 मे : उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे पीक (water melon) घेतले जाते शेतकरी कलिंगडला चांगला भाव मिळेल या आशेने हे पीक घेत असतो. कलिंगडचं पीक खर्चिक आणि वेळोवेळी योग्य काळजी घ्यावी लागते. या सगळ्यात येणारा माल व्यापाऱ्यांमार्फत अथवा बाजारात बसून खपवावा लागतो. हे पीक नाशवंत असल्याने जेवढे पीक काढले आहे तेवढे खपलं तर शेतकऱ्याला परवडतं. अन्यथा शेतकरी आतबट्यात जातो. दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यातील सुस्मिता सोनवणे या टरबूज उत्पादक शेतकरी महिलेने (women farmer) आपला कलिंगड (water melon) कवडीमोल भावात जात असल्याने काढलेला सगळा माल जनावरांना घातला आहे. या घटनेनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात कलिंगडच्या भावात अचानक घट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 10 रुपयाला चार कलिंगड देखील कोणी घ्यायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या येवल्यातील महिला शेतकऱ्याने कलिंगड थेट जनावरांपुढे टाकल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पीकाला भाव न मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

नाशिक जिल्ह्यात कांद्या पाठोपाठ आता टरबुजच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे महिलेने भावना व्यक्त केल्या. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचे पाहून सुस्मिता सोनवणे तरुण शेतकरी महिलेने दीड एकरात कलिंगडची लागवड केली होती. उत्पन्न देखील चांगले निघाले त्यामुळे दोन पैसे हातात पडतील असे वाटत असतांना कलिंगडच्या भावात मोठी घसरण झाली.

विक्रीसाठी बाजारात कलिंगड घेऊन गेल्यानंतर 2 ते 3 रुपयात देखील कोणी टरबूज घ्यायला तयार नव्हते. पिकांवर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या या महिला शेतकऱ्याने टरबूज अक्षरशः जनावरांपुढे टाकून संताप व्यक्त केला.

उन्हाळी पिकाच्या शेतकऱ्यांना झळा

गेल्या पाच ते सहा वर्षांत उन्हाळी हंगामात कमी दिवसात चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कलिंगड शेतीकडे पाहिले जाते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात कलिंगड शेती मोठ्या पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी होत आहे. मागच्या दोन वर्षात कोरोना काळ असतानाही या फळ उत्पादकांना चांगले पैसे मिळाले होते. यंदाही हंगामाची सुरुवात चांगली झाली. १० ते १२ रुपयांपर्यंत प्रतिकिलोला पैसे मिळत होते. मे महिन्याच्या सुरूवातीपासून टरबूजाचे दर घसरण्यास सुरूवात झाली. उत्तरेकडील तसेच पश्‍चिमेकडील राज्यात निर्यात होणाऱ्या टरबुजाची मागणी घसरल्याने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे.

First published:

Tags: Farmer, Farmer protest, Protesting farmers