लोकलमध्ये 'बच के रहेना रे बाबा', धावत्या ट्रेनमध्ये साप आढळल्याचा VIDEO व्हायरल

आज टिटळवाळ्याहून सीएसटीला येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये एका प्रवाशाने पंख्याला साप लटकलेला पाहिला आणि...

मुंबई, 02 ऑगस्ट : आज एका सापाने मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास केला आहे. साप शेतात, रस्त्यावर आणि घरात आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण मुंबईकरांनी साप चक्क लोकल ट्रेनमध्ये पाहिला आहे. हो, आज टिटळवाळ्याहून सीएसटीला येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये एका प्रवाशाने पंख्याला साप लटकलेला पाहिला आणि त्यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. हा सगळा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.अखेर ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. आता एक लोकल थांबवल्यामुळे बाकीच्या सगळ्या लोकलचं वेळापत्रक खोळंबलं. त्यामुळे मध्य रेल्वे आज एका नव्या कारणामुळे थांबली असं म्हणायला हरकत नाही.टिटळवाळ्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये साडे आठ वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. आपल्या डोक्याच्या वर पंख्यात साप अडकला असल्याने लोकलच्या डब्ब्यात मोठा गोंधळ सुरू होता. प्रवाशांना तर घामच फुटला होता. त्यामुळे साखळी ओढून रेल्वे थांबवण्यात आली. पण त्याआधी खबरदारी म्हणून प्रवाशांनी लोकमधले पंखे बंद केले होते. ट्रेन थांबताच सगळे प्रवासी खाली उतरले. आणि नंतर त्या सापाला ट्रेनच्या बाहेर काढण्यात आलं.

हेही वाचा...भरधाव वेगात 2 चारचाकी धडकल्या, 4 जणांचा जागीच मृत्यूरेल्वेत स्टंटबाजी करणारे मुंबईचे 4 'विलन' अखेर पोलिसांच्या ताब्यातVIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील

Trending Now