जळगाव 02 ऑगस्ट : जळगावमध्ये भरधाव वेगात चारचाकीची समोरा-समोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नशिराबादजवळ मध्यरात्री हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील चौघांचा जागीच दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नशिराबाद गावाजवळील वळणावर गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या वळणावर आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) आणि क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी असलेल्या समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव), दीपक अशोक चव्हाण (22, गेंदालाल मिल, जळगाव), सुबोध मिलिंद नरवाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव) आणि 18 वर्षीय अनोळखीचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या क्रेटा वाहनातील जळगावातील रहिवासी असलेल्या अग्रवाल कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी करण्याचं काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.