रेल्वेत स्टंटबाजी करणारे मुंबईचे 4 'विलन' अखेर पोलिसांच्या ताब्यात

लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या त्या चार टवाळक्यांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2018 10:04 AM IST

रेल्वेत स्टंटबाजी करणारे मुंबईचे 4 'विलन' अखेर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, 02 ऑगस्ट : लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या त्या चार टवाळक्यांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हे स्टंटबाज कुर्ला परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी धावत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी व्हिडिओ त्यांनी स्वतःच मोबाईलवर शूट केला हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका

रविवारी दुपारी चार स्टंटबाजांनी जीटीबी ते सीएसएमटी प्रवासादरम्यान जीवघेणी स्टंटबाजी करत होते. एवढचं नाही तर एका तरुणाने तर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. धावत्या लोकलमधून बाहेर लटकत, कधी लोकलच्या वर चढून हे तरुण स्टंट करत असतात. त्यांच्या टवाळक्यांमुळे इतर प्रवाशी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. अशा या टवाळखोरी मुलांना अखेर ताब्यात घेण्यात आलं आहे.

जिवाची कोणतीही पर्वा न करता या 4 तरुणांनी जे स्टंट केले ते खरंच त्या तरुणांच्या आणि इतर प्रवाशांच्या जिवावर बेतले असते. हे चार हुल्लडबाज कोण होते, हे अद्याप समोर आलेलं नाही. अशा स्टंटबाजांना शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे या व्हिडीओत दिसणारे हुल्लडबाज कुठे दिसतील, तर पोलिसांना नक्की कळवा असं आव्हान काल मीडियाडून करण्यात आलं आणि आज अखेर पोलिसांनी या 4 रेल्वे विलनला ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...