हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हेमंत करकरे यांच्या मृत्यूची पुनः चौकशी व्हावी आणि त्यासाठी विशेष टीमची स्थापना करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती

Madhura Nerurkar
मुंबई, 05 जुलै: सर्वोच्च न्यायालयाने माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची पुनः चौकशी करणारी याचिका फेटाळली आहे. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी दोन हात करताना करकरे यांना वीरमरण आले होते. मात्र करकरे यांचा मृत्यू उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी केला अशी याचिका दाखल करण्यात आली होती.हेही वाचा: Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारीयाआधीही उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. बिहारमधील माजी आमदार राधाकांत यादव यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. हेमंत करकरे यांच्या मृत्यूची पुनः चौकशी व्हावी आणि त्यासाठी विशेष टीमची स्थापना करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ हेमंत करकरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळस्कर दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माइलशी दोन हात करत असताना तिघांनाही वीरमरण आले होते. कसाब आणि इस्माइल यांनी त्यांच्या पोलीस व्हॅनव बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारीत तिघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कारहेही वाचा: रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका

Trending Now