मुंबई, 26 जून : मफतलाल समूहाचे विशाद मफतलाल यांनी मुंबईत 89 कोटींचं घर घेतलं आहे. दक्षिण मुंबईच्या अल्टामाऊंट रोडवर लोढा अल्टामाऊंट या टोलेजंग इमारतीत त्यांनी ड्युप्ले अपार्टमेंट खरेदी केलं आहे. हे घर घेण्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटीच जवळपास साडे चार कोटींच्या घरात आहे. 10 हजार स्क्वेअर फूटचं हे घर मफतलालना 88 हजार रुपये प्रति चौरस फूट भावाला पडलं आहे. त्यांना यासोबत 9 पार्किंगही मिळाली आहेत. मफतलाल यांच्या या लक्झरी घराची किंमत रु. 88,200 प्रति चौरस फूट आहे. आपलं स्वत:चं घरं असावं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. त्यात इतकं मोठं घरं म्हणजे त्याची बातच काही और आहे. हेही वाचा…