मुंबई, 14 डिसेंबर : सायन इथल्या श्री सुंदर कमलानगरमध्ये अज्ञातांनी दुचाकी जाळल्या आहेत. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास 17 ते 18 दुचाकी वाहनं जाळण्यात आली. या दुचाकी कोणी जाळल्या, दुचाकी जळण्याचं नेमकं काय कारण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याआधी कधी असा दुचाकी जाळण्याचा प्रकार इथं घडला नव्हता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.