#sion

VIDEO : फुटओव्हर ब्रिजचा भाग ठेवताना क्रेन कोसळली

व्हिडिओOct 7, 2018

VIDEO : फुटओव्हर ब्रिजचा भाग ठेवताना क्रेन कोसळली

मुंबई, 7 ऑक्टोबर : सायन-पनवेल महामार्गावर एक क्रेन कोसळलीय. मानखुर्द इथं महामार्गावर फुटओव्हर ब्रिजचा काही भाग ठेवत असताना ही क्रेन कोसळलीय. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. या अपघातानंतर मानखुर्दजवळ एक लेन बंद करण्यात आली असून या मार्गाची वाहतुक वळविण्यात आली आहे. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. या ठिकाणी असलेला पादचारी पुल काढण्याचं काम सुरू होतं. भाग यापूर्वीच काढण्यात आला होता, पुलाचा दुसरा भाग काढत असताना भार न झेपल्याने फुटओव्हर ब्रिजचा भाग क्रेनवर कोसळला आणि हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावरील दोन्हीकडच्या वहतुकीवर परिणाम झाला. तुर्तास पडलेला फुटओव्हर ब्रिजचा भाग आणि क्रेन उचलण्याचं काम सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close