मुंबई : सलग सातव्या दिवशी शेअर बाजार कोसळला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अजूनही कोसळलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही स्थिती गेल्या ६ ते ७ दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे आशियातील शेअर बाजारही कोसळला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आर्थिक मंदीचे संकेत आहेत. त्यामुळे भारतातील शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. आजही जागतिक संकेतांमुळे बाजारातील तणाव वाढला आहे. SGX निफ्टी सुमारे एक चतुर्थांश ते दोनशे अंकांनी खाली दिसत आहे. आशियाई बाजार देखील 2% पर्यंत घसरले आहेत. काल DOW आणि S&P 500 नव्या निचांकावर पोहोचून बंद झालं. चिनी चलन 14 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.
हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्नआरबीआय एमपीसीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू होत आहे. यानंतर शुक्रवारी पतधोरण जाहीर होणार आहे. यामध्ये दीड टक्का व्याजदरवाढ शक्य असल्याचे बहुतांश लोकांचे मत आहे.
सगळ्या सेक्टरमध्ये बाजारपेठेत दबाव असल्याचं दिसत आहे. मेटलमध्ये दीड ते दोन टक्क्यांनी दबाव आहे. तर बँकिंग सेक्टरमध्ये देखील दबाव आहे. मिड-स्मॉल कॅपमध्ये कमजोरी पाहायला मिळाली आहे.