मुंबई, 01 फेब्रुवारी : अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये तेजी निर्माण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 500 अंकाची वाढ झाल्याने 60 हजारांवर सेन्सेक्स सकाळपासूनच बाजारात तेजीत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स थोड्यावेळापूर्वी 60 हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2023 आणि 2024 चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेअर मार्केटमध्ये मात्र जोरदार उसळी घेताना पहायला मिळाले आहे. अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये मरगळ आली होती.
Budget 2023 : बजेटमध्ये घोषणांचा पाऊस, शेअर मार्केटमध्ये मोठी उसळीआज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स 60 हजारांच्या वर गेला.
अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारामन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या 10 मिनिटांत 600 अकांनी सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळाले आहे.
निफ्टीदेखील एक टक्क्याने वाढला. सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये 138 अंकाची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या निफ्टी 17801 वर पोहोचला आहे. सर्वच सेक्टरच्या शेअर्ससमोर आज हिरवा रंग दिसत आहे.
टीव्ही स्वस्त होणार विदेशी किचन चिमण्या महागणार सोनं चांदी महाग होणार आयात शुल्क कमी करण्याचा सरकारचा निर्णय कॅमेरा लेन्स स्वस्त होणार