JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI पुढील महिन्यात करणार या खात्यांचा लिलाव, वाचा कोणत्या Accounts चा आहे समावेश?

SBI पुढील महिन्यात करणार या खात्यांचा लिलाव, वाचा कोणत्या Accounts चा आहे समावेश?

बँकेने जारी केलेल्या नोटीसनुसार SBI नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स असणाऱ्या खात्यांचा लिलाव करणार आहे. बँक या लिलावातून 313 कोटींपेक्षा अधिक थकबाकी वसूल करेल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 जुलै: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI ने जारी केलेल्या नोटीसनुसार, एसबीआय पुढील महिन्यात दोन नॉन-परफॉर्मिंग खात्यांचा (NPA) लिलाव करेल. या लिलावातून बँक 313 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम जमा करेल. हा लिलाव ऑनलाईन होणार आहे.  6 ऑगस्ट रोजी हा ई-लिलाव होणार असून या दोन खात्यांमध्ये भद्रेश्वर विद्युत प्रायव्हेट लिमिटेड (बीव्हीपीएल) चे थकित कर्ज 262.73 कोटी आहे आणि जीओएल ऑफशोर लिमिटेडची 50.75 कोटींची थकबाकी आहे. काय आहे योजना? एसबीआयने नोटीसमध्ये म्हटले आहे की, वित्तीय मालमत्तांबाबतच्या बँकेच्या धोरणाच्या संदर्भात, नियामक मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने आम्ही ही खाती एआरसी/ बँका/ एनबीएफसी/ वित्तीय संस्थांना विक्रीसाठी ठेवतो. याकरता काही नियम आणि अटी लागू आहेत. भद्रेश्वर विद्युत प्रायव्हेट लिमिटेडसाठी 100.12 कोटी आणि जीओएल ऑफशोरसाठी 51 कोटी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. हे वाचा- केवळ 7-14 दिवसांसाठी SBI, PNB सह या बँकांमध्ये गुंतवा पैसे, मिळेल मोठा फायदा हे वाचा- 1.2 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA-DR संदर्भात महत्त्वाचं अपडेट बँकेने या लिलावाकरता इच्छुक उमेदवारांना बँकेमध्ये  एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (expressions of interest) दाखल करण्यास सांगितले आहे. नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट (non-disclosure agreement)अंमलात आणल्यानंतर तात्काळ या संपत्तींची तपासणी करण्यास सांगितले आहे. SBI ने असं म्हटलं आहे की, ‘कोणतंही कारण न सांगता प्रस्तावित विक्रीबाबत पुढे न जाण्याचा अधिकारही आम्ही सुरक्षित ठेवत आहोत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या