नवी दिल्ली, 07 जुलै: देशभरातील 1.2 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee's) आणि पेन्शनर्ससाठी (Pensioner's) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डीए आणि डीआर संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) याबाबत कॅबिनेटकडून घेण्यात येणारा अंतिम निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Modi Cabinet Meetings) याबाबत अंतिम फैसला होईल अशी शक्यता होती, पण मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली होती की DA आणि DR शिवाय जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या एरिअरबाबतही निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये बंपर पगार मिळू शकतो.
आज कॅबिनेटमध्ये होईल निर्णय
आज 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. मीडिया अहवालांच्या मते या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए संदर्भात चर्चा होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी 26 जून रोजी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली अर्थ मंत्रालय आणि नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. ज्यामध्ये सप्टेंबरमध्ये डीए देण्याबाबत चर्चा झाली होती. ओ
हे वाचा-केवळ 7-14 दिवसांसाठी SBI, PNB सह या बँकांमध्ये गुंतवा पैसे, मिळेल मोठा फायदा
आतापर्यंत तीन हप्ते आहेत पेंडिंग
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीए-डीआरचे 3 हप्ते मिळणं बाकी आहे. गेल्या दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे एकूण तीन महागाई भत्त्याचे हप्ते (1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021) फ्रीझ करण्यात आले होते, त्यामध्ये जुलै 2021 चा हप्ता आणि ऑगस्ट 2021 च्या एरियरसह हे संपूर्ण देय सप्टेंबर 2021 मध्ये दिलं जाईल.
हे वाचा-10 हजारात सुरू करा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाख रुपयांची कमाई; सरकार देईल सब्सिडी
वाचा किती मिळेल सॅलरी?
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी कॅलक्यूलेशन साठी उदाहरणार्थ कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 20,000 रुपये आहे कर त्याचा मासिक डीए 20000 च्या 28 टक्केपर्यंत वाढेल. याचा अर्थ असा की मासिक डीएमध्ये वाढ 20000 रुपयांच्या 11 टक्के अर्थात 2200 रुपये होईल. केंद्र सरकारचे अन्य कर्मचारी ज्यांचे 7th Pay Commission मध्ये मॅट्रिक्समध्ये वेगवेगळे मासिक मूळ वेतन आहे, ते तपासून घेऊ शकता डीए मिळाल्यानंतर त्यांचा पगार किती वाढेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dearness allowance, Dearness relief, Money