पुणे, 27 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Reserve Bank of India) नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुण्यातील दोन सहकारी बँकांवर आणि एका गैर बँकिंग वित्तीय संस्थेवर (NBFC) दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सादर केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की पुण्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेवर (Jijamata Mahila Sahakari Bank) वैधानिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBIने जारी केलेल्या दुसऱ्या एका निवेदनानुसार पुणे स्थित मुस्लिम सहकारी बँक लि. वर आरबीआयने नो युवर कस्टमर (KYC Know Your Customer) संदर्भात जारी केलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने अशी देखील माहिती दिली आहे की, केवायसी बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे शेयद शरीयत फायनान्स लि. या गैर बँकिंग वित्तीय संस्थेला देखील 5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हे वाचा- पैशांची गरज असेल तर Gold Loan चांगला पर्याय, एका क्लिकवर मिळवता येईल हे कर्ज धनलक्ष्मी बँकेवरही आकारला दंड याआधी देखील विविध नियमांचे आणि तरतुदींचे उल्लंघन केल्याने आरबीआयने विविध बँकांवर दंड आकारला आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने धनलक्ष्मी बँकेवर ‘ठेवीदारांना माहिती आणि जागरूकता निधी योजना’ संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. आरबीआयने 27.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे वाचा- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अद्यापही अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार या मध्यवर्ती बँकेव्यतिरिक्त, गोरखपूर स्थित NE आणि EC रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बहुराज्य प्राथमिक सहकारी बँकेवर देखील काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 20 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बँकेने या दोन बँकांना एकूण 47.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.