JOIN US
मराठी बातम्या / मनी / Nirmala Sitharaman On Budget 2023: 'गेमचेंजर ठरणार पीएम विकास योजना...', अर्थमंत्र्यांचे भाष्य

Nirmala Sitharaman On Budget 2023: 'गेमचेंजर ठरणार पीएम विकास योजना...', अर्थमंत्र्यांचे भाष्य

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटनंतर पहिल्यांदाच न्यूज 18 ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे.

जाहिरात

पीएम विकास योजनेवर निर्मला सीतारामन यांचे भाष्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Nirmala Sitharaman Interview after Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी 2.0 सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यानंतरची पहिली मुलाखत त्यांनी News18 ला दिला आहे. मुलाखतीदरम्यान, त्यांनी अर्थसंकल्पातील विविध घोषणांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी पीएम विकास योजनेवर मोठे भाष्य केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुलाखती दरम्यान म्हणाल्या की, कोविड-19 सारख्या सर्व जागतिक अनिश्चितता समोर असताना देकील आपण आर्थिक सुधारणा सुरू ठेवल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सातत्याने चर्चा केली जात होती. न्यूज 18 सोबत बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ही परिस्थिती सांभाळण्यासाठी माझ्या समोर कोणतेही उदाहरण नव्हते. यापूर्वी असे काहीच घडले नव्हते. ज्यावरुन काही गोष्टींचे पालन केले जाऊ शकेल. महामारीनंतर आम्ही सर्व हितधारकांसोबत संवाद साधत राहिलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेचे नेतृत्त्व केले. त्यांनी आमच्याशी बोलणे सुरु ठेवले. ’ Budget 2023: 10 पॉइंट्समध्ये संपूर्ण बजेट; कोणत्या घोषणांचा तुमच्यावर थेट परिणाम होईल  

2023 च्या अर्थसंकल्पाविषयी काय म्हणाल्या अर्थमंत्री?

2023 च्या अर्थसंकल्पातून अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या परिणामांबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन न्यूज 18 शी बोलताना म्हणाल्या की, ‘मला आशा आहे की, परदेशांमधून येणाऱ्या लोकांसह पर्यटनात लक्षणीय बदल होईल. अर्थव्यवस्था सक्रिय ठेवण्याचा हा एक चांगला उत्तम मार्ग असेल. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, ‘मी एक चांगला अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी गोष्ट म्हणून पाहते. बाजारावर अर्थसंकल्पाचा तत्काळ प्रभाव येत्या काही दिवसांतही कायम राहील. तसेच सीतारामन म्हणाल्या की, सरकारने करदात्यांसाठी नवीन आयकर व्यवस्था अधिक आकर्षक बनवली आहे. मध्यम लोकांच्या फायद्यासाठी त्याच्या संरचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत.’ Budget 2023 : Aadhaar-PAN Card संदर्भात मोठ्या घोषणा! अवश्य घ्या जाणून

पीएम विकास योजनेविषयी काय म्हणाल्या?

पीएम विकास योजनेविषयी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्या म्हणाल्या की, ‘मी पीएम-विकास योजनेकडे खूप आशेने बघतेय. कारण याची खूप मोठी बाजारपेठ आहे आणि ही योजना लॉन्च झाल्यामुळे आपण मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचू शकू.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या