Live Updates : ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ, बजेट सादर केल्यानंतर अर्थमंत्र्यांची पहिली मुलाखत

Nirmala Sitharaman Interview Live: वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिली मुलाखत News18ला दिली आहे.

  • News18 Lokmat
  • | February 03, 2023, 15:24 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    21:51 (IST)

    केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटींच्या निधीची तरतूद, राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करणार, यासह 'बुलेट ट्रेन' प्रकल्पासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचं काम पूर्णत्वास झालं असल्याची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

    21:23 (IST)

    'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
    विशाळगड होणार अतिक्रमणमुक्त
    सरकारकडून 1 कोटी 17 लाख 9 हजार मंजूर

    18:18 (IST)

    कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर बैठकीत चर्चा
    मविआ कसबा, पिंपरी-चिंचवड दोन्ही जागा लढणार
    उमेदवारांबाबत अंतिम निर्णय उद्या जाहीर करणार
    मित्रपक्ष आणि वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार
    मविआ दोन्ही जागांचं वाटप उद्या जाहीर करणार

    17:55 (IST)

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली
    कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीवर चर्चा
    थोड्याच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

    17:36 (IST)

    राज्यात तृतीयपंथी समुदायासाठी विशेष वॉर्ड, अद्ययावत तंत्रज्ञान या वॉर्डमध्ये वापरलंय - गिरीश महाजन

    17:12 (IST)

    दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
    'आम्ही सांगितलेलं उद्धव ठाकरे ऐकत नव्हते'
    'अजित पवार सांगतात आणि ठाकरे ते ऐकत होते'
    आम्हाला त्यावेळी वाटत होतं - दीपक केसरकर
    'आता अजित पवारांचाही भ्रमनिरास झालाय'
    'एक चांगली बाब झाली असं मला स्वत:ला वाटतं'
    पक्ष कशामुळे फुटला हेही जनतेला कळलं - केसरकर

    15:5 (IST)

    सर्व घटकांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला - अर्थमंत्री


    15:4 (IST)

    सर्व घटकांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला - अर्थमंत्री

    15:0 (IST)

    Live Updates : बजेटनंतर अर्थमंत्र्यांची पहिलीच मुलाखत


    13:53 (IST)

    अमरावतीत 'मविआ'चे धीरज लिंगाडे विजयी
    अमरावतीत भाजपचे रणजित पाटील पराभूत
    30 तासांनंतर अमरावती पदवीधरचा निकाल

    मुंबई : वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिली मुलाखत News18ला दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यामागे अर्थमंत्र्यांची नेमकी भूमिका काय होती, यामागे काय विचार होता, हे विस्तृतपणे समजावून सांगितलं. निर्मला सीताराम यांनी मोदी सरकार 2.o चा शेवटचा बजेट सादर केला होता.