मुंबई, 21 जानेवारी: जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या नोकरकपात सुरु आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झालीये. अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या यादीत गुगलही सामील झाले आहे. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घोषणा केली आहे की, अमेरिकन टेक दिग्गज कंपनी सुमारे 12,000 लोकांना काढून टाकत आहे. हे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के इतके आहे. जागतिक बाजारपेठेत महागाई आणि मंदीचा सामना करावा लागत आहेत. याच कारणामुळे अनेक टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकरीवरुन काढून टाकत आहेत. गुगलही या कंपन्यांमध्ये सामील झाले आहे.
एका ओपन लेटरमध्ये सुंदर पिचाई म्हणाले की, ‘माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक कठीण बातमी आहेत. आम्ही आमच्या कर्मचार्यातील अंदाजे 12,000 लोकांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अमेरिकेतील प्रभावित कर्मचार्यांना आधीच एक वेगळा मेल पाठवला आहे. इतर देशांमध्ये , स्थानिक कायदा आणि प्रॅक्सिट पाहता या प्रक्रियेला जास्त वेळ लागेल.’ ‘21 वर्षे काम केलं अन्….’, नोकरी गेल्यानंतर Microsoft च्या कर्मचाऱ्याचे भावुक पत्र कर्मचार्यांना पाठवलेल्या मेलमध्ये पिचाई यांनी लिहिले की, ‘आमच्यासाठी फोकस वाढवणे, कॉस्ट बेसमध्ये बदल करणे आणि आमचे टॅलेंट आणि भांडवल हे आमचे सर्वोच्च प्राधान्य बनवण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.’ गुगलच्या या निर्णयाचा एचआर आणि कॉर्पोरेट तसेच इंजीनियरिंग आणि प्रोडक्ट्स टीमवरही परिणाम होईल. गुगलने सांगितले की, ही टाळेबंदी जागतिक आहे आणि अमेरिकेत काम करणार्या कर्मचार्यांवर त्याचा तात्काळ परिणाम होईल. वंदे भारत ट्रेनमध्ये आता स्लीपर कोचही, या सुपरफास्ट ट्रेनचा वेग किती?
गुगल व्यतिरिक्त, अॅमेझॉन देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कमी करण्याची तयारी करत आहे. Amazon पुन्हा एकदा सुमारे 18,000 लोकांना कामावरून काढून टाकू शकते. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अॅमेझॉनने वॉशिंग्टनमधील 2,300 कर्मचाऱ्यांना आधीच काढून टाकले आहे. यातील बहुतांश कर्मचारी सिएटल येथील अॅमेझॉनच्या मुख्य कार्यालयात काम करत होते.