मुंबई, 17 जानेवारी: येत्या 1फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. आर्थिक वर्ष 202-23 आता संपणार आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या पेटीतून आयकर सवलती दिली जाईल अशी आशा लोकांना आहे. अर्थसंकल्पातील टॅक्स स्लॅबकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या देशात आयकराचे दोन स्लॅब आहेत. या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जर एखाद्याचा पगार 50 हजार असेल तर नवीन किंवा जुन्या टॅक्स स्लॅबवर किती कर कापला जाईल, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही अर्थसंकल्पीय सत्रांमध्ये कर स्लॅबमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. सध्या दोन कर प्रणाली उपलब्ध आहेत.पहिल्या प्रणालीला ओल्ड टॅक्स स्लॅब म्हणून ओळखले जाते. त्याच वेळी, 2020 मध्ये, सरकारने करदात्यांना दिलासा देत नवीन टॅक्स स्लॅब सुरू केला होता. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे सोपे करण्यासाठी एक नवीन टॅक्स स्लॅब सुरू करण्यात आला. मात्र, सरकारने नवीन स्लॅबसह जुना देखील कायम ठेवला आहे.
ओल्ड स्लॅबमध्ये 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स जमा करावा लागत नाही. यासोबतच कलम 80 C च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर टॅक्स जमा करण्यापासून सूट मिळते. अशा पद्धतीने टॅक्सपेयर्सना जवळपास साडे 6 लाखांपर्यंतच्या इनकमवर टॅक्स द्यावा लागत नाही. ओल्ड टॅक्स रेजिम किंवा जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये इनकम टॅक्स रेट मुख्यत्वे तुमचे उत्पन्न आणि इनकम स्लॅबवर अवलंबून असते. TAX वाचवण्याचा सिक्रेट फंडा, एकदा समजून घ्याल तर म्हणाल….
मासिक पगार 50 हजार रुपये असेल आणि उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसेल तर वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये असेल. तुम्ही ओल्ड सिस्टम निवडल्यास, आयकरच्या कलम 80C (IT कायदा 80C)अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन मिळते. नोकरदार लोकांना देखील 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळतो. ओल्ड सिस्टममध्ये अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% टॅक्स भरावा लागेल. मात्र 12,500 रुपयांच्या सवलतीनंतर ते शून्य होते. म्हणजेच या स्लॅबनुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. Income Tax: टॅक्स वाचवण्यासाठी घाईघाईत गुंतवणूक करताय? त्या पूर्वी जाणून घ्या भविष्यातील अडचणी
नवीन टॅक्स स्लॅबमध्ये, 2.50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री आहे, परंतु त्यानंतर 2.5 लाख रुपयांवर 5% कर आकारला जाईल, जो 12,500 रुपये होईल. 6 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर 24,400 रुपये कर आकारला जातो. जर उत्पन्न 5 लाखांपेक्षा 1 लाख रुपये जास्त असेल, तर ती 1 लाख रुपयांची रक्कम 10% च्या ब्रॅकेटमध्ये येईल. यावर 10,000 रुपये कर आकारला जाईल. तसेच, गणना केलेल्या करावर 4% उपकर (सेस) लावला जाईल. जर कर 12,500 रुपये असेल तर उपकर 900 रुपये असेल.
तुम्ही कलम 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपये बचत करु शकता. यासाठी EPF, PPF, ELSS, NSC मध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही नॅशनल पेंशन सिस्टममध्ये वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. तर सेक्शन 80CCD(1B) अंतर्गत तुम्हाला अतिरिक्त 50 हजार रुपये इन्कम टॅक्स सूटचा फायदा घेऊ शकता. होम लोन घेतलेले लोक अतिरिक्त 2 लाख रुपये वाचवू शकता.