JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI-PNB सह या बँका देत आहेत कमाईची संधी, केवळ 14 दिवसांत मिळवा नफा

SBI-PNB सह या बँका देत आहेत कमाईची संधी, केवळ 14 दिवसांत मिळवा नफा

Fixed Deposit: स्टेट बँक ऑफ इंडिया ते पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसह तुम्ही ही एफडी करू शकता. जाणून घ्या एफडीवर तुम्हाला किती व्याज मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: तुम्हाला देखील 7 ते 14 दिवसात चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर सरकारीसह खाजगी बँका तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्ही बँक एफडीमध्ये (Bank Fixed Deposit) 7 ते 14 दिवसांसाठी गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता. या कालावधीसाठी विविध बँकांमध्ये एफडीवरील व्याजदर वेगवेगळा आहे. जाणून घ्या या कमी कालावधीच्या एफडीवर तुम्हाला किती व्याजदर मिळेल… 1. स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांच्या एफडीसाठी 2.90 टक्के दराने व्याजदर देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी SBI 3.40 दराने व्याज देत आहे. 2. बँक ऑफ बडोदा- BoB मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.30 टक्के आहे 3. आयसीआयसीआय बँक- ICICI Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 2.50 दराने एफडीवर व्याज देत आहे. 4. एचडीएफसी बँक- HDFC Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3.00 टक्के दराने एफडीवर व्याज देत आहे. हे वाचा- Petrol Price Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी काय आहे पेट्रोल-डिझेल दर,इथे तपासा दर 5. बँक ऑफ इंडिया- BOI मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 03.00 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के आहे 6. पीएनबी आणि पंजाब अँड सिंध बँक- PNB आणि पंजाब अँड सिंध बँकेमध्ये सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के दराने एफडीवर व्याज मिळते आहे. या दोन्ही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के दराने FD वर व्याज मिळते आहे. 7. यूनियन बँक ऑफ इंडिया- या बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. 8. बंधन बँक- बंधन बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे. 9. येस बँक- YES बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे. हे वाचा- बाप्पाच्या आगमनादिवशी स्वस्त झालं सोनं, 500 रुपयांनी उतरले भाव; काय आहेत आजचे दर 10. डीसीबी बँक- डीसीबी बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 4.55 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 5.05 टक्के दराने व्याज मिळते आहे. 11. इंडियन ओव्हरसीज बँक- याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 3.40 दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 3.90 टक्के दराने व्याज मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या