रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 09 फेब्रुवारी : काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. अखेर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असताना काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे एका व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला होता, ही माहिती आमदार प्रज्ञा सातव यांनी काल रात्री उशिरा ट्विटद्वारे दिली होती. (मविआ सरकार पडण्याचे शिवसेनेनं फोडले नाना पटोलेंवर खापर, केला गंभीर आरोप) या व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव त्यांना पाठीत थापड मारून त्यांच्या सुरक्षारक्षकाला देखील ढकलून दिल्याचं प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. त्याने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहे. काय म्हणाल्या प्रज्ञा सातप पोस्टमध्ये? माझे पती राजीव सातव नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाही वर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन, कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई फुले, इंदिराजी यासारख्या थोर महिलांवर ही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बघता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. असं प्रज्ञा सातव त्यात फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर लिहिले. (थोरातांसाठी शिवसेना उतरली मैदानात, काँग्रेस हायकमांडला दिला सबुरीचा सल्ला) मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न झाला असून माझ्या जीवाला धोका आहे. महिला आमदारावरचा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोरून लढा मागून हल्ला करण्याचा भ्याडपणा करू नका, असं प्रज्ञा सातव त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.