प्रतिकात्मक फोटो
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 26 जुलै : वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच महिलांना विजेची आस लागली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजेची आस लागलेल्या या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे (रा. आर्वी), असे वीज पडून मृत्यू झालेल्या या महिलेचे नाव आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. पाच महिलांना विजेची आस लागली. विजेची आस लागलेल्या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे, असे आर्वी येथील रहिवासी असलेल्या या मृत महिलेचे नाव आहे. हेही वाचा - राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, कोल्हापूरला महापूराचा धोका? Video चंद्रपूर जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू - चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या दरम्यान वीज पडून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचे मृत्यू झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही तालुक्यातील शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना प्रकाशझोडे आणि परसोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तिसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला. यानंतर चौथ्या घटनेत गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग - पुणे शहर आणि जिल्ह्यातील पावसाचा जोर आता वाढलाय. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झालाय. त्यामुळे पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यातील खडकवासला धरण आता 91 टक्के भरलंय. या धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झालीय. खडकवासला धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मंगळवारी संध्याकाळपासून या धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असलं तरी पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली असं म्हणता येणार नाही.