कोल्हापूर 26 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पासामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. आज (26 जुलै) धरणारे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणाचा पहिल्यांदा 6 नंबरचा दरवाजा स्वयंचलित दरवाजा हा सकाळी 08.15 मिनिटांनी, दुसरा 5 नंबरचा दरवाजा 09.10 मिनिटांनी, 10.03 मिनिटांनी 3 नंबरचा तर लगेचच 10.06 मिनिटांनी 4 नंबरचाही दरवाजा उघडला आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झालाय. राधानगरी धरण मंगळवारी 95 टक्के भरलं होतं. त्यानंतर नदीकाठच्या गावातील नागरिंकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबतीत जिल्हा प्रशासनाने आधीच 2019 आणि 2021 च्या पुरात बाधित ठरलेल्यांना स्थलांतरीत होण्यासाठी समान बांधून तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
किती सुरु आहे विसर्ग ? सध्या राधानगरी धरण हे पूर्णपणे भरले असून सकाळी 6 नंबरचा एकच स्वयंचलित दरवाजा उघडला होता. त्यानंतर 5 नंबरचा आणि पुढे 3 आणि 4 नंबरचा दरवाजा उघडला असल्यामुळे धरणाच्या या तीन दरवाज्यांतून 5712 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 3,4,5 आणि 6 नंबरच्या 4 दरवाज्यांतून एकूण 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 5 इंच इतकी होती. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 81 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान पंचगंगेने 39 फूटांची इशारा पातळी केव्हाच ओलांडली असून नदीची धोका पातळी कडे वाटचाल सुरू आहे. त्यात आता धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढल्यास काही तासातच नदीची पाणी पातळी 7 ते 8 फूट देखील वाढू शकते, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता.
राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आल्यानं कोल्हापूरकरांना महापूराचा धोका निर्माण झाला आहे.#kolhapurflood #Kolhapur #Local18 #news18lokmat #marathinews pic.twitter.com/ilrQ0ngM5e
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2023
कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी राधानगरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धरण बांधले होते. या धरणामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. या धरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे आहे. धरणातील पाणीसाठा वाढला की धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होऊ लागतो. हे स्वयंचलित दरवाजे त्यावर पडणाऱ्या पाण्याच्या आणि वाऱ्याच्या दबावामुळे आपोआप उघडले जातात. तुम्हाला माहितीये का पावसाच्या ग्रीन, ऑरेंज, रेड अलर्टचा नेमका अर्थ काय? सोशल मीडियावर अफवा.. राधानगरी धरण पूर्णत: भरत आल्यामुळे दरवाजे कधी उघडले जाणार, याकडेच सर्वजण लक्ष ठेवून होते. मात्र त्यातच सोशल मीडियावर धरणाचा एक दरवाजा उघडण्याचा सुद्धा व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता. अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाटू लागली होती त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. 25 जुलै रोजी रात्री अकरा वाजता कोणताही दरवाजा उघडला नसल्याचे सांगितले होते.