JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंत्रालयातील ती शापित खोली; 'केबिन नंबर 602', अजित पवारांनीही दिला इथे बसण्यास नकार, पण का?

मंत्रालयातील ती शापित खोली; 'केबिन नंबर 602', अजित पवारांनीही दिला इथे बसण्यास नकार, पण का?

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरची केबिन नंबर 602 सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. असं मानलं जातं, की आतापर्यंत हे केबिन ज्या मंत्र्यांना मिळालं, त्या मंत्र्यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

जाहिरात

मंत्रालयातील ती शापित खोली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 जुलै : मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरची केबिन नंबर 602 सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पण ही केबिन आता पहिल्यांदा चर्चेत आली असं नाही. तर याआधीही अनेकदा या केबिनची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे हे केबिन घेण्यास बहुतेक मंत्री नकार देतात. मात्र, असं का? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर याचं कारण असं की ही केबिंन शापित असल्याची चर्चा नेहमीच मंत्रालयात बघायला मिळते. असं मानलं जातं, की आतापर्यंत हे केबिन ज्या मंत्र्यांना मिळालं, त्या मंत्र्यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आता पुन्हा एकदा ही केबिन चर्चेत आली आहे. याचं कारण असं की अजित पवार यांचा गटही आता भाजप आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सत्तेत सामील झाला आहे. अशात अजित पवारांनीही आता 602 नंबरची केबिन घेण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे. दिव्य मराठीने याबाबतचं वृत्त दिलं आहे Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस-अजितदादा ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! ही केबिन शापित असल्याची चर्चा नेहमीच होत राहाते. या अंधश्रद्धेमुळे बहुतेक वेळा हे दालन रिकामेच असते. इथे बसण्यास बहुतेक मंत्री टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ही केबिन असून हा मजला राज्याचं सत्ताकेंद्र मानलं जातो. कारण याच मजल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची केबिन आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी हे दालन घेण्यास नकार दिल्यानंतर सचिवांचा कक्ष रिकामा करण्यात आला आणि हे दालन पवार यांना देण्यात आलं. 602 हे केबिन अजित पवारांसाठी रिकामं असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव ब्रजेश सिंह तसंच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचं केबिन रिकामं करण्यात आलं आणि ते अजित पवार यांना देण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या