JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

Weather Update : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र 25 जुलै रोजी तयार झालं असून पुढच्या 48 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता

जाहिरात

मुसळधार पावसाचा इशारा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Hमुंबई, २६ जुलै : मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. त्यातच हवामान विभागाने आता मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या विभागांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 28 जुलै रोजी तीन विभागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी फोन पूर्ण चार्ज करुन घराबाहेर पडावं. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

NEWS18 लोकमत IMPACT: एक बातमी अन् आठवड्यात उभारला लोखंडी पूल, विद्यार्थ्यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तिथल्या शाळांना सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचेही आवाहन करण्यात आले असून काही मदत संपर्क नंबर प्रासरित करून मदत मागण्यासाठी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

पावसाच्या पाण्यात डझनभर गॅस सिलेंडर गेले वाहून, धक्कादायक Video समोर

संबंधित बातम्या

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र 25 जुलै रोजी तयार झालं असून पुढच्या 48 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 48 तास हवामानात वेगाने बदल होऊ शकतात तर अनेक ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या