वाशिम, 18 जानेवारी: वाशिम (Washim) जिल्ह्यात झालेल्या 163 ग्रामपंचायती पैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित 152 ग्रामपंचायतींचा निकाल (gram panchayat election result 2021)सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला 25, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेसला 24, भाजप ला 10 तर मनसेला एका ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं. त्या राजकिय पक्षाकडून सांगण्यात आलंय तर स्थानिक विकास आघाड्याला 72 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं आहे. आमदार अमित झनक यांच्यासाठी त्यांच्या मांगुळ झनक या ग्रामपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनी या ग्रामपंचायतीवर 9 पैकी 9 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन होऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं निकालावरून स्पष्ट होतांना दिसत आहे. हेही वाचा… Gram Panchayat Result 2021: पुण्यात कुठे फुललं कमळ तर कुठे राष्ट्रवादीचं वर्चस्व वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या अनसिंग ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनलने एकूण 17 पैकी 15 जागी विजय मिळविला आहे. तर कामरगाव ग्रामपंचायत मध्ये 17 पैकी भाजप प्रणित परिवर्तन पॅनलने 14 जागा जिंकल्या आहेत तर शेलुबाजार ग्रामपंचायतच्या 13 जागांपैकी पैकी 7 जागांवर परिवर्तन पॅनल विजयी झाली आहे. हराळ ग्रामपंचायतीवर पंचायत समिती सदस्य विष्णुपंत खाडे यांच्या सार्वजनिक विकास आघाडीने 13 पैकी 9 जागांवर विजय संपादित केला आहे. रिसोड तालुक्यातील चिंचाम्बा पेण ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी सुमनबाई लक्ष्मण सरनाईक आणि ज्योती विनोद सरनाईक यांना 251-251 अशी सारखी मतं मिळाल्यानं निकाल टाय झाला होता. त्यांनतरईश्वर चिठ्ठीने सुमन लक्ष्मण सरनाईक या निवडून आल्यात. तर मालेगाव तालुक्यातील राजुरा आणि वाशिम तालुक्यातील काटा ग्रामपंचायतची एक जागा टाय झाली आहे. त्यात राजुरा इथं विकास पॅनल विजयी तर काटा ग्रामपंचायतमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला सारख्याच जागा मिळाल्याने एका जागेच्या निर्णयानंतर कुणाची सत्ता येईल हे समजेल. या ग्रामीण भागातील राजकारणात आपलं ही असित्व असावं म्हणून शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी ,भाजपा,स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी स्थानिक पातळीवर उमेदवार उभे करून निवडणूक लढविली आहे. यामध्ये कुणाला किती यश मिळाले ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. हेही वाचा… रावसाहेब दानवेंची मुलगी आणि जावई पराभूत, मुलगा आदित्यनेच उभे केले होते पॅनल! गृहमंत्री अनिल देशमुखांचं ‘या’ तालुक्यांत वर्चस्व नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या गटाने एकहाती विजय मिळवला आहे. काटोल (Katol) मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील 17 पैकी 16 ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.