वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 24 फेब्रुवारी : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत 8 राज्यातील युवकांचा युवा संगम मणिपूरमध्ये होणार आहे. राज्यांतील परंपरा, संस्कृती, पर्यटनस्थळ, खानपान, भाषा, विविधता यांद्वारे देशातील विविधतेतील एकतेचे दर्शन यामध्ये होईल. हा 5 दिवसीय युवा संगम 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार असून मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स अँड स्पोर्ट कल्चर भारत सरकार तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या युवा संगममध्ये वर्धा जिल्ह्यातील साहिल दरणे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्रातून 50 जणांची निवड मणिपूरमध्ये होणाऱ्या युवा संगमसाठी 8 राज्यातून येणारे युवक हे 18-30 वर्ष गटातील आहे. महाराष्ट्रातून केवळ 50 युवकांची निवड झाली असून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रत्येक युवकावर सरकार जवळपास 45 हजार रूपये खर्च करणार आहे.
वर्ध्यातील साहिल दरणेची निवड महाराष्ट्रातील 50 युवकांमध्ये वर्ध्यातील साहिल नंदकिशोर दरणे याचीही निवड झाली आहे. साहिल दरणे टाकळी (दरणे) येथील मुळ रहिवाशी आहे. तो एलएलबीचा विद्यार्थी असून सुप्रसिध्द अँकर आणि उत्तम वक्ता आहे. स्वतःच्या आवाजाच्या जादूगरिने त्याने अगदी कमी वयात हजारो मंच गाजवले आहेत आणि त्याचा प्रवास निरंतर सुरूच आहे. त्याच्या या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. 27 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता साहिल नागपूरवरून विमानाने मणिपूरसाठी रवाना होणार आहे. तर 3 मार्चला परतणार आहे. Wardha News: सरकारच्या ‘मार्जिन मनी’ योजनेकडं लाभार्थ्यांची पाठ, प्रस्तावच येईना! कर्नाटक युथ फेस्टिवलमध्येही प्रतिनिधित्व या आधी सुध्दा साहिल दरणे ह्याने कर्नाटक युथ फेस्टिवल 2023 मध्ये आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आता मणिपूरमध्ये सुध्दा कला क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायला साहिल हा सज्ज झाला आहे.