JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / wardha news: वर्धा जिल्ह्यात शंभरी पार 'इतके' मतदार, 8716 तरुणांची नव्याने नोंदणी

wardha news: वर्धा जिल्ह्यात शंभरी पार 'इतके' मतदार, 8716 तरुणांची नव्याने नोंदणी

वर्धा जिल्ह्यात प्रशासन तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करत आहे. जिल्ह्यात 8,716 तरुण मतदार वाढले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 4 मार्च : तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, नवीन मतदारांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सध्या 18 ते 19 वयोगटातील 8 हजार 716 मतदारांची संख्या वाढली आहे. सध्या एकूण 10 लाख 90 हजार 753 मतदार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. शंभरी पार 1174 मतदार गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढत आहे. यावरून मतदानाकडे नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे सिद्ध होते. यामध्ये सर्वाधिक सक्रिय वृद्ध आणि तरुण मतदार दिसून येत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वयोगटातील सुमारे 1 हजार 174 मतदार आहेत.

कोणताही तरुण मतदानापासून वंचित राहू नये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावर मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा निवडणूक विभाग व प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत सार्वजनिक कार्यक्रम, सण-उत्सवांच्या वेळी स्वतंत्र कक्ष तयार करून त्याद्वारे नवीन मतदारांची नोंदणी व मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी उपक्रम सुरू केले. प्रशासनाच्या या प्रयत्नाला मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढत आहे. Wardha News: धक्कादायक वास्तव! दर उन्हाळ्यात ‘ही’ 7 गावं होतात रिकामी बी. एल. ओ. घरोघरी पोहोचले वयोवृद्ध मतदारांच्या ओळखपत्रात काही त्रुटी आढळून आल्यास त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. 80 वर्षांवरील मतदारांच्या घरोघरी पोहोचून बीएलओ ओळखपत्र तपासत आहेत आणि त्यात सुधारणा करत आहेत. यासोबतच एकही नागरिक त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी वर्षातून 4 वेळा नवीन मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती अतुल रसपायले, नायब तहसीलदार, निवडणूक विभाग यांनी दिली आहे. तहसीलमधील मतदार संख्या मतदारसंघ. || 18 ते 39. || 40 ते 69. || 70 ते100(वय) आर्वी - 44. || 100605. || 127537. || 29469 देवळी - 45. || 99290. || 134747. || 32968 हिंगणघाट 46. || 113828. || 146999. || 33381 वर्धा - 47. || 104797. || 139463. || 27669

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या