वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 3 मार्च : उन्हाळा सुरू झाला की राज्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पूर्व भागातील 7 गावे उन्हाळा आला की रिकामी होतात. गाव सोडून निघून जाण्याची ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे. दरवर्षी हीच समस्या असताना शासनाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. 4 ग्रामपंचायतीतील 7 गावांना पाण्याची समस्या आष्टी तालुक्याच्या पूर्वेस उंच भूभागावर वसलेल्या चार ग्रामपंचायतीतील सात गावांना प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामध्ये थार, चामला, किन्ही, बामरडा, बोरखेडी, मोइ, मुबारकपूरसह सीमेवर असलेल्या कारंजा तालुक्यातील बोटोना या गावांचे समावेश आहे. या गावांचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे 5 हजार 630 हेक्टर असून त्यापैकी चार हजार 567 हेक्टर जमिनीवर शेती केली जाते.
शहराकडे स्थलांतर या गावांची एकूण लोकसंख्या ही 8 हजाराच्यावर आहे. गावात राहणारी शंभर टक्के लोकसंख्या ही पूर्णता शेती व्यवसायावर अवलंबून आहे व या भागातील अर्थव्यवस्थाही पूर्णता शेतीवर अवलंबून आहे. या 7 गावांतील गवळी समाज पशुपालन व्यवसाय करतो. तर मजुराला फक्त शेतीमध्ये काम मिळते. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. उन्हाळ्यात पाणी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असते. त्यांना गाव व कुटुंब सोडून शहराकडे कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. बर्फगोळ्यासोबत गाण्याची मेजवानी, बीडच्या विक्रेत्याची सर्वत्र चर्चा, Video जुलै ते डिसेंबरच मिळते पाणी येथील शेती ही पूर्णता मान्सूनवर अवलंबून आहे. येथे शासनाच्या सिंचनाच्या योजना अद्याप पोहोचल्या नाही. परिणामी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या भागात फक्त सहा महिने जुलै ते डिसेंबर शेतीसाठी पाणी वापरायला मिळते. त्यात चार महिने पावसाळा असतो. या भागातील नद्या, नाले, विहिरी डिसेंबर जानेवारी महिन्यात कोरड्या पडतात. एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. पशुपालकांची जनावरांसह भटकंती एप्रिल महिना ते पावसाळ सुरू होईपर्यंत जनावरांना घेऊन चाऱ्याच्या व पाण्याच्या शोधात पशुपालकाना भटकंती करावी लागते. गाव कुटुंब सोडून तीन ते चार महिने बाहेर काढावे लागते. गावाची आर्थिक स्थिती हालाखिची असल्याने शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण, लग्न, आरोग्य सुविधा या बद्दल पालक वर्ग पूर्णता चिंतेत आहेत. या भागात शेतीला आवश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत.