JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: वर्ध्यातील महिलेच्या मृत्यूनंतर आई-वडील अन् भावाने घरातच पुरला मृतदेह; कारण जाणून धक्काच बसेल

Wardha News: वर्ध्यातील महिलेच्या मृत्यूनंतर आई-वडील अन् भावाने घरातच पुरला मृतदेह; कारण जाणून धक्काच बसेल

मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करणार? असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला. यानंतर चक्क भावाने घरातच खड्डा करून त्यातच आपल्या बहिणीचा मृतदेह पुरला.

जाहिरात

भावाने घरातच पुरला बहिणीचा मृतदेह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा 14 जुलै : वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. यात काही महिन्यांपासून आजारी असलेल्या मुलीचा घरातच मृत्यू झाला. परिस्थिती हलाकीची असल्याने हे कुटुंब मुलीच्या मृत्यूनंतर चिंतेत होतं. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करणार? असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला. यानंतर चक्क भावाने घरातच खड्डा करून त्यातच आपल्या बहिणीचा मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना तब्बल 10 दिवसानंतर 13 जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेचा खुलासा होताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्रविणा साहेबराव भस्मे (वय 37) रा. आदर्शनगर असं मृत तरुणीचं नाव आहे. मृत प्रविणा ही मागील काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती. ती मानसिक रुग्ण असल्याने घराबाहेर कुठेही फिरत नव्हती. अशातच 3 जुलै रोजी रात्री सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रविणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कुठून आणणार असे अनेक प्रश्न कुटुंबियांसमोर उभे झाले. आधी शिकवलं; नोकरीसाठी पाठवलं दुबईत, पत्नीनं दिली घटस्फोटाची नोटीस रात्रभर विचार करुन दुसऱ्या दिवशी 4 जुलै रोजी सकाळी 7 वाजता मुलीचा मृतदेह घरातच खड्डा करून त्यात पुरण्यात आला. विशेष म्हणजे मृत महिलेच्या भावानेच हा मृतदेह पुरला. मात्र, याबाबतची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मिळाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच आदर्शनगर गाठून घराची पाहणी केली. यावेळी घरात खड्डा खणल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तत्काळ याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री 7 वाजता फॉरेन्सिक टीमसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर घरातील खड्ड्यात पुरलेला महिलेचा मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या