जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आधी शिकवलं; नोकरीसाठी पाठवलं दुबईत, पत्नीनं दिली घटस्फोटाची नोटीस

आधी शिकवलं; नोकरीसाठी पाठवलं दुबईत, पत्नीनं दिली घटस्फोटाची नोटीस

पत्नीनं दिली घटस्फोटाची नोटीस

पत्नीनं दिली घटस्फोटाची नोटीस

sdm jyoti maurya like case in kushinagar : ज्योती मौर्य प्रकरणानंतर आणखी एक अशीच घटना समोर आली, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

कुशीनगर : यूपीमधील अधिकारी ज्योती मौर्य सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यानंतर देशभरातून अशाच आणखी काही घटना समोर आल्या आहेत. कुशीनगर इथे नवऱ्यानं आपल्या दिव्यांग पत्नीला शिकवलं. तिला नोकरी मिळवण्याएवढं स्वत:च्या पायावर उभं केलं एवढंच नाही तर नोकरीसाठी परदेशात दुबईला पाठवलं. पतीचे ऋण फेडण्याऐवजी मात्र त्याच्या हातात तलाखचे पेपर्स आले आहेत. पत्नी विदेशात जाताच नवऱ्याला घटस्फोट देण्याचं तिने ठरवलं. एवढंच नाही तर तिने आपल्या 3 वर्षीय मुलाचाही विचार केला नाही. पती आता आपल्या लहान मुलाला घेऊन मदतीसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी भटकत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कुशीनगर येथील रहिवासी असलेल्या लवकुश सिंहचा विवाह अंगिरा सिंहसोबत 2018 मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नाच्या वेळी लवकुशला माहीत नव्हते की ज्या अंगिरासोबत सात जन्म एकत्र राहाण्याची स्वप्न पाहात आहे. तीच त्याचा सर्वात मोठा विश्वासघात करेल. पत्नी परदेशात जाऊन आपल्या निरागस मुलाला विसरेल. लग्नानंतर पत्नीच्या इच्छेला मान देत कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या लवकुशने आधी पत्नी अंगिरा सिंगला बीएडपर्यंत शिकवलं आणि नंतर तिला नोएडा इथे घेऊन गेला. चांगली नोकरी मिळवून दिली.  अंगिरा सिंगला पतीचे प्रेम आणि समर्पण याचं मोल कदाचित कळलं नसावं. 2020 मध्ये मूल झाल्यानंतर अंगिराने मुलाची काळजी घेण्यासाठी पतीला नोकरी सोडण्यास भाग पाडलं.

SDM ज्योती मौर्यची इज्जत तिच्या पतीने…, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची महत्त्वाची टिप्पणी

अंगिराने नोएडास्थित मदरसन सुमी सिस्टम लिमिटेडमध्ये काम सुरू ठेवले. दरम्यान, कंपनीने अंगिराला दुबईला जाण्याची ऑफर दिली. पत्नीवर विश्वास असलेल्या लवकुशला पहिला धक्का बसला जेव्हा त्याच्या पत्नीने आपल्या मुलाला सोडून दुबईला जाण्याची इच्छा व्यक्त केली. लवकुशने मुलाला इथे ठेवून एकटीने दुबईला जाऊ नये असं सांगितलं, त्याने तिच्या निर्णयाचा विरोध केला आणि इथेच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अंगिराने त्याला चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखवून पटवून दिले. यानंतर लवकुशनेच अंगिराचा पासपोर्ट बनवला. यानंतर अंगिरा आपल्या मुलाला आणि पतीला सोडून दुबईला गेली. काही दिवस सर्व काही ठीक होते. अंगिरा पती लवकुश आणि मुलाशी व्हिडिओ कॉल आणि इतर माध्यमातून बोलण्याबरोबरच काही पैसे पाठवत राहिली. काही महिन्यांनंतर तिचं वागणं बदलू लागलं. अचानक तिने पती आणि मुलाशी बोलणे बंद. याबाबत लवकुशने कंपनीकडे तक्रार केल्यावर कंपनीने अंगिराला परत बोलावले. अंगिरा भारतात परत आली आणि थेट बहिणीकडे गेली, तिने महाराजगंज कोर्टात पती लवकुशसोबत घटस्फोटाचा खटला दाखल करून तिने नोटीस पाठवली. जेव्हा त्याने नोटीस पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आता त्याच्याकडे नोकरी नसल्याने मुलाचं पालनपोषण कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे ज्या पत्नीसाठी एवढं सगळं केलं ती मात्र दुबईमध्ये मजा मारत होती असा दावा पतीने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात